दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यासाठी अमळनेर तालुका महाविकास आघाडीने आंदोलन करून प्राध्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील *दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यासाठी अमळनेर तालुका महाविकास आघाडीने आंदोलन करून प्राध्याधिकाऱ्यांना दिले निवेदन आज दिनांक 31 जुलै 2025 रोजी अमळनेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीने दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवाफर पक्षाचे दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष शांताराम सखाराम कोळी( मांडळ) यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही मार्गाने आंदोलन करून माननीय उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग, अमळनेर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले याप्रसंगी अंमळनेर तालुका महाविकास आघाडीचे नेते माजी आमदार आबासाहेब डॉ. बी एस पाटील यांनी त्यांच्या मनोगतातून सांगितले की यापुढे माझ्या दवाखान्यात दिव्यांगांना मोफत सेवा देण्यात येईल तसेच घोरपडे सरांनी सरकारकडे मागणी केली की राज्यपाल नियुक्त दिव्यांगांचा विधान परिषदेवर आमदार असला पाहिजे .तसेच शिवसेनेचे विजू मास्तर यांनी सांगितले की दिव्यांग बांधवांना वेळेवर पेन्शन मिळत नाही त्यांना सरकारी कार्यालयांमध्ये फिरवा फिरव केले जाते याप्रसंगी ग्रंथालय सेलचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, ज्येष्ठ नेते प्रा. अशोक पवार सर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनगर अण्णा पाटील, संदीप घोरपडे सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डी एम पाटील सर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बी. के. सूर्यवंशी, शहराध्यक्ष गजेंद्र साळुंखे, मनोज बापू,प्रताप आबा, प्रवीण जैन, भागवत गुरुजी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत दादा निकम, ॲड शकील काझी,जाकीर शेख, अरुण शिंदे सर, किसान सेलचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, युवक अध्यक्ष योगेश सिसोदे, दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष डी एम कासार सर, महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्ष कविता पवार, शिवसेनेच्या मनीषा परब, शिवसेनेचे शहराध्यक्ष चंद्रशेखर भावसार, विलास पवार, बाळासाहेब पाटील देवेंद्र देशमुख, मोहन भोई, गोकुळ कोळी,वासुदेव मामा, चिंधू वानखेडे, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच तालुक्यातून आलेले दिव्यांग बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डी एम पाटील सर व आभार प्रदर्शन बी के सूर्यवंशी यांनी केले.