ताज्या घडामोडी

शिराळ्यात इंद्रप्रस्थ पतसंस्थेचा ७ वा वर्धापन दिन साजरा

शिराळा प्रतिनिधी.

इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्था, शाखा शिराळाचा सातवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अभिवादन करण्यात आले.यावेळी बोलताना चेअरमन संग्रामसिंह पाटील म्हणाले, सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन व इंद्रप्रस्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक दिलीप पाटील (तात्या) यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची स्थापना सन १९९४ साली करण्यात आली आहे. लवकरच आम्ही ३०० कोटींचा व्यवसायाचा टप्पा पार करत आहे. तसेच संस्थेचा शाखा विस्तार सांगली जिल्ह्याबरोबर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, सातारा, कोल्हापूर येथे करणार आहे. यावेळी कामगार केसरी अभिजित शेणेकर ,सचिन नलावडे, गजानन सोनटक्के, नगरसेवक संजय हिरवडेकर, आर.बी. शिंदे, शाखा सल्लागार सचिन परदेशी,अमोल पारेख,डाँ विक्रम यादव,अशोक पाटील,जयसिंग पवार,सुदाम गायकवाड, व्हा. चेअरमन अधिक चव्हाण, संचालक मोहनराव शिंदे, प्रमोद कदम,संतोष बांदिवडेकर व सर्व स्टाफ यावेळी उपस्थित होते शाखाधिकारी अविनाश पाटील यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??