ताज्या घडामोडी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वव्यापी…बाळासाहेब चोपडे.

Spread the love

जयंतीनिमित्ताने पुस्तक प्रदर्शनाचेे आयोजन…

पंडित विष्णू दिगंबर पलूसकर शैक्षणिक संकुलात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी आयोजित प्रतिमापूजन प्रसंगी जेष्ट शिक्षक आनंदराव सावंत, बाळासाहेब चोपडे,बळीराम पोतदार, शामकांत मेंगाणे माध्यमिक व ज्युनिअर विभागातील सर्व शिक्षक,शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते..

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते

यावेळी कु.प्रतीक्षा महाजन, अर्णव कांबळे,साक्षी वाघमारे ,वेदिका हराळे,सानिका कदम या विद्यार्थ्यांनी,सौ.प्रि्या.नाटेकर मॅडम ,पी.जे.माळी, बी.डी.चोपडे यांनी आपल्या मनोगतातून डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील विविध आठवणींना उजाळा दिला.सुञसंचालन बळीराम पोतदार, आभार विकास कांबळे यांनी मानले. संयोजन मुख्याध्यापक तानाजी करांडे यांच्या मार्गदर्शनानुसार सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ. प्रज्ञा बिराज,सौ.सुनिता कोळी, तृप्ती पाटील,शंकर गस्ते, यांनी केले.माध्यमिक,ज्युनिअर विभागातील सर्व शिक्षक, सर्व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष उदय परांजपे , उपाध्यक्ष .विश्वास रावळ, सचिव जयंतीलाल शहा,मुख्याध्यापक टी.जे.करांडे, यांनी सर्वांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. जयंतीनिमित्ताने आयोजित केलेल्या सर्व उपक्रमांचे कौतुक केले

बाळासाहेब चोपडे म्हणाले, 14 एप्रिल 1891 रोजी जन्मलेल्या बाबासाहेबांनी महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, गोलमेज परिषद, पुणे करार, विविध संस्थांची स्थापना स्वातंत्र्यलढा सहभाग अशा कितीतरी गोष्टी केल्या. भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सर्वव्यापी आहेत. त्यांनी केलेले कार्य खूप महान आहे .

सौ.प्रिया नाटेकर म्हणाल्या भारतीय संविधानाचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री होते.आचार-विचारांत राष्ट्रप्रेम,राष्ट्रनिष्ठा ठासून भरलेली होती.स्वातंत्र्य,समता,बंधुता या मुल्यांचा अंगीकार केला.त्यांच्या विचारांना एका चौकटीत बसवू नये. लोकशाही रुजविण्यापासून ते सर्वांगीण शिक्षणापासून ते समानतेच्या विचारापर्यंत प्रत्येक विचारात डॉ. आंबेडकर यांचे प्रतिबिंब उमटले आहे,

पी.जे.माळी म्हणाले “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या त्रिसूत्रीवर भर देत प्रगती आणि विकास साधण्याचा विचार दिला. डॉ. आंबेडकर यांचे सर्वच विचार समाजासाठी गरजेचे आहेत. त्यांच्या विचारांनीच आज देश बदलला आहे. .जयंतीपुरते त्यांचे विचार आठवण्यापेक्षा आयुष्य त्यांच्या विचारांनी घडवावे.. डॉ. आंबेडकर यांचे विचारांना एका चौकटीत न अडकवता मुक्त अवकाश द्यावा. हीच त्यासाठी आपण दिलेली खरी पोचपावती असेल असे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!