ताज्या घडामोडी

कोकण विभागीय होमिओपॅथिक डॉक्टर्स मेळावा आयोजन

Spread the love

दिनांक १५.
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी व रत्नागिरी होमिओपॅथिक डॉक्टर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 28 एप्रिल 2024 रोजी भव्य दिव्य अशा कोकण विभागीय होमिओपॅथिक डॉक्टर्स मेळावा हॉटेल वूड्स गुहागर येथे आयोजन .करण्यात आले आहे. अत्यंत नैसर्गिक व रोगाचे समूळ नष्ट करणे हे होमिओपॅथिचे वैशिष्ट्य आहे .विविध असाध्य रोगावर प्रभावी औषध उपचार असणारी ही पॅथी जगभरात वेगाने वाढत आहे. होमिओपॅथिक उपचाराच्या प्रचार व प्रसारासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी डॉ. रजनीताई इंदुलकर अध्यक्ष होमिओपॅथिक सल्लागार समिती महाराष्ट्र शासन, डॉ. विलास हरपाले अध्यक्ष होमिओपॅथिक परिषद डॉ.बाहुबली शाह माजी अध्यक्ष होमिओपॅथिक परिषद, डॉ. सुनील मुळीक सदस्य होमिओपॅथिक सल्लागार समिती महाराष्ट्र शासन ,डॉ. नितीन गावडे सदस्य होमिओपॅथिक सल्लागार समिती महाराष्ट्र शासन, प्रमुख मार्गदर्शक डॉ. दीपक जगताप, डॉ. हिरालाल अग्रवाल आदी मान्यवर या मेळाव्यासाठी उपस्थित राहणार आहेत. कोकण विभागातील रायगड ,रत्नागिरी सिंधुदुर्ग ,येथे कार्यरत असणारे होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमासाठी डॉ.संदीप जाधव अध्यक्ष रत्नागिरी, डॉ अरुण कुमार भगत अध्यक्ष रायगड मेडिकल असोसिएशन, डॉ. रणजीत पाटील उपाध्यक्ष रत्नागिरी असो.,डॉ. विलायत मुकादम सेक्रेटरी रत्नागिरी असो .,डॉ.संजीव सोंड्ये खजिनदार रत्नागिरी असो., डॉ.अरुण पाटील माजी अध्यक्ष, डॉ. आदेश पात्रे माजी अध्यक्ष ,डॉ. राजेंद्र पाटील माजी अध्यक्ष रायगड असो. ,डॉ. राहुल सुकाळे उपाध्यक्ष रायगड असोसिएशन, डॉ. राजेंद्र धात्रक माजी उपाध्यक्ष रायगड मेडिकल असोसिएशन, डॉ.प्रवीण सावंत अध्यक्ष सिंधुदुर्ग होमिओपॅथिक असोसिएशन, डॉ. गिरीश बोर्डवेकर कार्यकारी अध्यक्ष सिंधुदुर्ग होमिओपॅथिक असोसिएशन, डॉ. दीपक ठाकूर सचिव सिंधुदुर्ग असोसिएशन, डॉ.शरद काळसेकर खजिनदार सिंधुदुर्ग असोसिएशन.. आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामध्ये NCH नोंदणी होणार आहे .होमिओपॅथिच्या प्रचार व प्रसारासाठी आयोजित केलेल्या या मेळाव्यास सर्वांनी उपस्थित राहण्यासाठी रत्नागिरी होमिओपॅथिक असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संदीप जाधव व कार्यक्रम मेळावा कार्यकारणी समिती यांनी आव्हान केले आहे..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!