ताज्या घडामोडी

मानुसकीचे दर्शन करणखेडे ता. अमळनेर येथे आगीत भस्मसात झालेल्या दोन घरांच्या परिवाराला केली भरीव मदत

Spread the love

ईगल न्यूज अमलनेर प्रतिनिधि एस एम पाटील

करणखेडे येथील बापू राजधर मनोरे व आसाराम राजधर मनोरे या दोघांच्या घराला आग लागून घरातील सर्व संसारोपयोगी वस्तू जळून भस्मसात झाल्या . त्यासोबतच घरातील वर्षभर लागणारे धान्य व इतर अन्नपदार्थ जसे डाळी , वडे, पापड ,कुरडया ,गहू ,तांदूळ यासह रोज वापरण्यासाठी लागणारे कपडे तसेच अंथरून पांघरून देखील यात वाचले नाही . मात्र सुदैवाने यात कोणाचीही जीवित हानी झाली नाही . म्हणून मग अमळनेर तालुक्यातील मौर्य क्रांती संघटनेच्या माध्यमातून धनगर समाज बांधव व अमळनेर तालुका काँग्रेस कार्यकर्ते यांनी मिळून भरीव मदत जमा केली .
14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून करणखेडा येथे समक्ष जाऊन तेथे दोघेही कुटुंबीयांची विचारपूस केली , त्यांना धीर दिला , त्यांच्या हाती मदत सोपविताना संदीप घोरपडे यांनी गावकऱ्यांना आवाहन केले की दिनांक 17 रोजी आपल्या ग्रामदैवताची यात्रा आहे या यात्रेच्या निमित्ताने गावातील तरुण कार्यकर्त्यांनी समजूतदार ज्येष्ठ नागरिकांना सोबत घेऊन मदत फेरी काढावी . व या कुटुंबीयांचे उध्वस्त झालेले जीवन पूर्वपदावर येण्यासाठी आपापल्या क्षमतेनुसार मदत करावी त्याचप्रमाणे संदीप घोरपडे यांनी अमळनेर तालुक्यात गोरगरीब वंचित तसेच अडीअडचणीला सतत समाज हिताच्या कामाला पुढे असणारे मंगळदेव ग्रह मंदिर ट्रस्ट कार्यकारणी व अध्यक्ष राजू महाले सर यांनाही विनंती केली की आपण आपल्या भक्त परिवार व मित्र मंडळाच्या मदतीने करणखेडा तसेच पिंपळी या गावी देखील असेच आगीत भस्मसात झालेल्या कुटुंबीयांना धीर द्यावा . त्यासाठी आपल्या कल्पनेप्रमाणे या कुटुंबीयांना कशी मदत होईल याचे नियोजन करावे व मंगळ देव मंदिर ट्रस्टने तसेच काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी देखील या मदतीसाठी वेळ देण्याचे मान्य केले. याप्रसंगी अमळनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष भागवत सूर्यवंशी , शहराध्यक्ष मनोज पाटील , गोकुळ बोरसे , बन्सीलाल भागवत , प्रताप नागराज पाटील , रोहिदास तुका पाटील , रामकृष्ण पाटील , तेले सर , सरपंच गुलाब धनगर, सुधाकर बाबा , कवी शरद धनगर , प्रशांत निकम व काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस संदीप घोरपडे आदी उपस्थित होते त्या प्रसंगी कुटुंबीयांना आपल्या भस्म सात झालेल्या संसाराची राख रांगोळी पाहून भडभडून आले होते . अशी वेळ कोणावरही येऊ नये किंवा अशी वेळ कोणावर आल्यास संकट समय माणुसकीच्या नात्याने तिथे धावून जायला हवे असा संदेश काँग्रेस कार्यकर्त्यांच्या संस्कारातून कृतीतून दिसून आला .
आपल्यातला एक
संदीप घोरपडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!