ताज्या घडामोडी

क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजाची मानसिकता बदलविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे….प्रा.प्रकाश माळी

Spread the love

थोर विचारवंत महात्मा जोतिबा फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजाची मानसिकता बदलविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे.” असे प्रतिपादन मुंबई क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष डॉ.प्रा.प्रकाश संतोष माळी यांनी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या १९७ व्या जयंतीनिमित्त सोसायटी हॉल,शास्त्रीनगर,वाशी नाका,चेंबूर येथे खान्देश मित्र मंडळ आयोजित कार्यक्रमात केले.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे डॉ.प्रा.प्रकाश संतोष माळी,मा.नगरसेविका अंजली नाईक,मुंबई माळी समाज मंडळाचे उपाध्यक्ष प्रकाश माधवराव महाजन व कार्यकारी सदस्य ऍड.शांताराम भिकन महाजन तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष वसंतराव नथ्थू महाजन यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून झाली.प्रा.प्रकाश माळी यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.तसेच सागर जामनिक,हरकभाई सिंग,छबुलाल गणपत माळी,अंबादास काटकर,सारिका बोराडे,गणेश पाटील,उज्वलाताई काटकर,जयदीप आमरे,लक्ष्मण रेतावलकर,रुपेश गावकर,बाबुराव कदम,छायाताई साळुंखे,मायाताई साखरे यांनी महात्मा फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.या प्रसंगी माळी समाजातील बंधू-भगिनींसोबत इतर समाजातील बंधू-भगिनींनी देखील महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली.यावेळी अंजली नाईक,डॉ.प्रा.प्रकाश संतोष माळी,ऍड.शांताराम महाजन व गणेश पाटील यांनी महात्मा फुलेंच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले.यावेळी कु.मानसी जितेंद्र माळी,कु.मनस्वी जितेंद्र माळी,कु.तेजल चुनिलाल माळी,योग चुनिलाल माळी,कु.गार्गी शंकर पाटील व दिवांशू संदीप पाटील यांनी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.तसेच कु.गार्गी शंकर पाटील व कु.तेजल चुनिलाल पाटील या छोट्या मुलींनी इंग्रजीमधून व्यक्त केलेले महात्मा फुलेंविषयीचे विचार कौतुकास्पद ठरले.या सर्व सहभागी मुलामुलींना सुरेश पंडित लोखंडे यांच्याकडून नोटबुक व पेन देण्यात आले.कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन भूषण नामदेव महाजन तर आभार प्रदर्शन सुरेश पंडित लोखंडे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरेश पंडीत लोखंडे,वसंतराव नथ्थू महजन,दिलीप भोजू महाजन,जगन्नाथ दयाराम माळी,शशिकांत मोतीलाल महाजन,प्रकाश आनंदा महाजन,ज्ञानेश्वर छबुलाल माळी,जितेंद्र छबुलाल माळी,रविंद्र छबुलाल माळी,समाधान गोकुळ महाजन,विक्रम भगवान महाजन,विजय रामकृष्ण महाजन व भूषण नामदेव महाजन यांच्यासह सर्व युवक,युवती व भगिनींनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!