ताज्या घडामोडी

हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडवा या निमित्ताने लुईसवाडी येथील फन स्कूल प्ले ग्रुप अँड नर्सरी (स्थापना 1997)यांच्यातर्फे नववर्ष स्वागत यात्रा

Spread the love

हिंदू नववर्ष अर्थात गुढीपाडवा या निमित्ताने लुईसवाडी येथील फन स्कूल प्ले ग्रुप अँड नर्सरी (स्थापना 1997)यांच्यातर्फे नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली .या नववर्ष स्वागत यात्रे मध्ये शाळेच्या संचालिका सौ अनिता चंद्रशेखर जगताप यांच्यासोबत शाळेतील 30 मुलं आणि त्यांचे पालक सामील झाले होते .आपल्या हिंदू सणाचे महत्व मुलांना लहान वयातच पटावं तसेच सध्याच्या पिढीतल्या लोकांनाही त्याचं महत्त्व कळावे याकरता हे नववर्ष स्वागत यात्रेचा आयोजन दरवर्षी केले जाते. स्वागत यात्रेत सामील झालेले सर्वांनी पारंपारिक वेशभूषा धारण केली होती.गेले सात वर्ष या नववर्ष स्वागत यात्रेचा आयोजन होत आहे असे शाळेच्या संचालिका सौ अनिता जगताप यांनी सांगितले.या निमित्ताने पालकांना लेझीम शिकवण्यात आले तसेच ठिकठिकाणी पालकांनी लेझीम नृत्य सादर केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!