ताज्या घडामोडी

कार्टर रोड लायन्स क्लब तर्फे रुग्णांसाठी केराटोमीटर मशीन

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी

लायन्स क्लब ऑफ मुंबई कार्टर रोड यांच्या माध्यमातून वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटल यांना केराटोमीटर मशीन वितरित करण्यात आले.होली फॅमिली हॉस्पिटल आपल्या २० टक्के रुग्णांना पूर्णपणे मोफत उपचार देते आणि अनेकांना अनुदान सुद्धा देते. हॉस्पिटलच्या या कार्याची लायन्स क्लब ऑफ कार्टर रोड ने दखल घेऊन हे हायटेक मशिन वितरित करण्यात आले. हे मशीन नेत्ररोग विभागात वापरण्यात येणार असून ते डोळ्यांचे अचूक निदान करू शकणार आहे.

या हॉस्पिटलमध्ये वर्षाला सुमारे ९ हजार रुग्णांची तपासणी होते. अशा रुग्णांसाठी नवीन मशीन ची खूपच गरज होती. अत्याधुनिक पद्धतीने बनवलेल्या या मशीनची किंमत चार लाख असून या मशीनमुळे साधारणपणे दहा वर्षांमध्ये ९० हजार रुग्णांची तपासणी होणार आहे. या मशीन वितरणाच्या वेळी लायन्स क्लब ऑफ कार्टर रोडच्या प्रेसिडेंट ॲड. उन्नती धुरंदर यांनी देणगीदारांचे आणि हितचिंतकांचे आभार मानून रुग्णांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. या प्रसंगी क्लबचे पदाधिकारी आणि आजी माजी सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!