ताज्या घडामोडी

महाराष्ट्र खो-खो असोसिएशनची निवडणूक बिनविरोध

Spread the love

संजीवराजे नाईक-निंबाळकर – अध्यक्षपदी, सचिन गोडबोले – कार्याध्यक्षपदी,
डॉ. चंद्रजीत जाधव – सरचिटणीसपदी तर ॲड. गोविंद शर्मा-खजिनदारपदी

पुणे ७, एप्रिल (क्री. प्र.), २०२४ ते २०२८ या कालावधी करता निवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीत विविध पदांकरिता करिता कोणाचाही ज्यादा अर्ज न आल्याने ही निवडणूक आज बिनविरोध पार पडली. श्री शिवछत्रपती क्रीडा नगरी, सभागृह, बालेवाडी पुणे येथे पार पाडलेल्या निवडणुकीत खालील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत असे निवडणूक अधिकारी ॲड. धीरज सोपानराव कोल्हे यांनी जाहीर केले.

अध्यक्ष – संजीवराजे नाईक – निंबाळकर (सातारा)

उपाध्यक्ष (४ जागा): १. डॉ. जितेंद्र आव्हाड (ठाणे), २. अनिकेत तटकरे (रायगड), ३. महेश गादेकर (सोलापूर), ४. अशोक पितळे (अहमदनगर).

कार्याध्यक्ष – सचिन गोडबोले (पुणे)

सरचिटणीस – डॉ. चंद्रजीत जाधव (धाराशिव)

संयुक्त चिटणीस (५ जागा): १. डॉ. राजेश सोनवणे (नंदुरबार), २. डॉ. पवन पाटील (परभणी), ३. जयांशू पोळ (जळगाव), ४. बाळासाहेब (बाळ) तोरसकर (मुंबई), ५. वर्षा कच्छवा (बीड).

खजिनदार – ॲड. गोविंद शर्मा (संभाजी नगर)

यावेळी एम. एस. त्यागी (महासचिव – भारतीय खो खो महासंघ) यांची विशेष उपस्थिती होती. आज खो-खो हा खेळ ४९ देशात खेळला जात असून ३७ देशांत राष्ट्रीय खो-खो संघटनांची स्थापना झाली असून तेथे खोखो खेळ नियमित खेळला जात असल्याचे सांगितले व लवकरच खो-खो विश्वचषक स्पर्धा २०२४ च्या अखेर पर्यंत आयोजित करणार असल्याचे त्यागी यांनी सभेला मार्गदर्शन करताना स्पष्ट केले.

या सभेला उपकार सिंग (सहसचिव, भारतीय खो खो महासंघ) व अनिल झोडगे (सहसचिव, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोशिएशन) यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून कामकाज पहिले.

निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन माननीय संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी केले, तर चंद्रजीत जाधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!