ताज्या घडामोडी

गव्हाचा काड जाळू नका डॉक्टर अशोकराव ढगे

Spread the love

नेवासा तालुक्यातील अनेक ठिकाणी या पंधरा दिवसात गव्हाची मोठ्या प्रमाणात काढणी चालू आहे लवकर च्या गव्हापेक्षा उशिरा पेरणी केलेल्या गव्हाच्या उत्पादनात योग्य वाढ झाल्याचे आढळून येत आहे बहुतांशी शेतकरी गव्हाची सोंगणी हार्वेस्टर मशीनच्या साह्याने करत आहेत त्यामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गव्हाचा काड शिल्लक राहतो आपल्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी झाला आहे त्यासाठी जमिनीत जास्तीत जास्त सेंद्रिय पदार्थ गाडले पाहिजेत त्यामुळे गव्हाचा काड हे सोन्यासारखे महत्त्वाचे आहे कारण जमिनीची ती भूक आहे व त्यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारते जमीन भुसभुशीत होते जमिनीत हवा खेळती राहते जमिनीचा निचरा सुधारतो व विशेषतः जमिनीतील जिवाणूंना अन्न मिळते या सर्व फायद्यासाठी जमिनीमध्ये गव्हाचा काड गाढवा तो जळू नये गव्हाचा काड जाळल्यामुळे जमिनीचे तापमान वाढते जमीन घट्ट होते व जिवाणू मरतात हे सर्व तोटे होतात तेव्हा शेतकरी बंधूंनी गव्हाचा काड जाळू नये असे आवाहन कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!