ताज्या घडामोडी

बेस्टच्या शिवाजीनगर आगारातील वाहक रत्नाकर गुरव सेवानिवृत्त!

Spread the love

मुंबई- मुंबई महापालिकेच्या शिवाजीनगर बेस्ट बस आगारात वाहक पदावर काम करणारे रत्नाकर गुरव हे नुकतेच ३३ वर्षांची निष्कलंक सेवा बजावून सेवानिवृत्त झाले.त्याबद्दल त्यांचा सेवापूर्ती सत्कार सोहळा बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्या हस्ते पार पडला.याप्रसंगी सेवापूर्ती सोहळ्यासाठी बेस्टचे माजी अध्यक्ष अनिल पाटणकर यांच्यासह माजी नगरसेवक किसन मेस्त्री,शिवाजीनगर आगार व्यवस्थापक प्रशांत डोके,वरिष्ठ वाहतूक अधिकारी नितीन वाघमारे, नवाकाळचे उपसंपादक शंकर कडव,सौ.राजश्री रत्नाकर गुरव,सुनील भोसले,प्रशासकीय सहाय्यक अधिकारी भारती क्षीरसागर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बेस्टमधील वाहक मिलिंद भोईर यांनी केले.यावेळी अनेक बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना रत्नाकर गुरव यांच्यातील सेवाभावी आणि माणुसकी जपणार्‍या नात्यांच्या आठवणी जाग्या केल्या.या आठवणी ऐकताना उपस्थित अनेक कर्मचार्‍यांचे डोळे पाणावल्याचे दिसून आले. बेस्टमधील याआधी निवृत्त झालेले बहुसंख्य कर्मचारी रत्नाकर गुरव यांच्या सेवापूर्ती सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!