ताज्या घडामोडी

चाफेरी सहाणवाडी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

Spread the love

घरकुल महिला मंडळाचा विधवा प्रथा बंदचा निर्णय
खंडाळा वार्ताहार =चाफेरी येथे सहाणवाडी शिवस्मृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून शिवजयंती उत्सव साजरा
करण्यात आला. शिवज्योत किल्ले जयगड ते चाफेरी मिरवणुकीने आणण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून चाफेरी शाळेचे मुख्याध्यापक श्री. तुकाराम वासावे गुरुजी यांना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन केले.
उत्सवाचे हे ३३ वे वर्ष असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश सुर्वे यांनी सांगितले.उत्सावाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने विविध कार्यक्रम राबविण्यात आले.त्यात प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप व क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच जिंदाल कंपनीच्या माध्यमातून शैक्षणिक व नोकरी विषयी मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्याचा अनेक विद्यार्थ्यांनी व जनतेने मार्गदर्शन शिबिराचा लाभ घेतला.गेल्या वर्षी शिवजयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने नशाबंदी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाची दखल घेत चाफेरी ग्रामपंचायत आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी संस्था आणि संस्थेचे कार्यकर्ते यांना सन्मान चिन्ह व प्रशासकीय पत्रदेऊन सन्मानित करण्यात आले.
समाजात असलेल्या अनेक रूढी परंपरांना छेद देत संस्थेच्या घरकुल महिला मंडळाने विधवा प्रथा बंदिचा निर्णय घेत गावातील विधवा महिलांना हळदीकुंकू कार्यक्रमात निमंत्रित करून त्यांना समाजापासून व कोणत्याही धार्मिक कार्यापासून दूर न ठेवता कार्यक्रमात सहभागी होता यावे म्हणून त्यांना हळदीकुंकू व वाण देण्याचा महत्त्वपूर्ण असा उपक्रम राबविला. संध्याकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य पालखी मिरवणूक गावातून काढण्यात आली. कोकणची लोककला जागृत ठेवता यावी म्हणून संस्थेच्या कलाकारांच्या माध्यमातून नमन (कोकणचे खेळे) व संतोष पायरे लिखित सुख म्हणजे नक्की काय असतं! या वगनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!