ताज्या घडामोडी

मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे ते जबाबदारीने पार पाडा – सांगली जिल्हापरिषद मुख्याधिकारी तृप्ती धोडमिसे

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे आद्य कर्तव्य आहे ते जबाबदारीने पार पाडल्यास लोकशाही प्रमाणे देश चालण्यास मदत होईल व लोकशाहीचे बळकटीकरण होऊन देशाची प्रगती निश्चितच होईल असे प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले .

त्या खुंदलापूर धनगरवाडा येथे आयोजीत हातकणंगले लोकसभा मतदारसंघ व शिराळा विधानसभा मतदारसंघ आयोजीत मतदार जनजागृती कार्यक्रमात बोलत होत्या.यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी तथा स्वीप नोडल अधिकारी शशिकांत शिंदे, गटविकास अधिकारी संतोष राऊत, गटशिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी पोपटराव मलगुंडे,केंद्रप्रमुख हरिभाऊ घोडे रमण खबाले,मोहन पवार,एम.एन.पाटीलआदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी महिला व पुरुष मतदारांना येत्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी भाग्यश्री गावडे ,
पोलिस पाटील धाकलू गावडेआकाराम गावडे,महादू कोंडार,महादा पवार,अरुण नांगरे,ईश्वर चौधरी,श्रीयुत बजबळकर,आदी मान्यवर ,सतिश दाभाडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
खुंदलापूर धनगरवाडा येथे मतदार जनजागृती कार्यक्रमात मार्गदर्शन करताना मुख्यकार्यकारी अधिकारी तृप्ती धोंडमिसे, शशिकांत शिंदे,संतोष राऊत, पोपटराव मलगुंडे आदी मान्यवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!