ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य महिला उत्कर्ष समितीच्या कार्याध्यक्षा सौ.श्रुती सतिश उरणकर राज्यस्तरीय”राजमाता जिजाऊ”गौरव पुरस्काराने सन्मानित

Spread the love

(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर)-जनजागृती सेवा संस्था(रजि.)या सामाजिक संस्थेच्यावतीने८मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नुकताच बदलापूर येथील माहेरवाशीण संस्थेच्या प्रांगणात राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता,विविध प्रतिभावंत महिलांचा गौरव करण्यात आला.

त्यातीलच एक पुरस्कार प्राप्त महिला समाजसेविका श्रुती उरणकर.सतत समाजसेवेचा ध्यास असणा-या,समाजासाठी असामान्य कामगिरी करणा-या७५हुन अधिक पुरस्कार प्राप्त रणरागीणी श्रुती उरणकर या महाराष्ट्र राज्य महिला उत्कर्ष समितीच्या कार्याध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत.जनजागृती सेवा संस्थेने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महानगर विकास कृती समितीचे अध्यक्ष डाॅ.अमितकुमार गोविलकर यांच्या हस्ते श्रुती उरणकर यांना राज्यस्तरीय”राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार”समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला.श्रुती उरणकर या नामदेव शिंपी समाज मंडळ डोंबिवली,भाजपा महिला मोर्चा उपाध्यक्षा-डोंबिवली पुर्व मंडळ,जनजागृती सेवा संस्था,संचालिका-तेजस एंटरप्रायझेस,आधार इंडिया संस्था,ग्लोबल मालवणी कोकण-मुंबई,गणेश मंदिर संस्था न डोंबिवली,क्षणभर विश्रांती,अशा विविध संस्थांनवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे त.राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून वीरांगना ट्रस्टच्या फाऊंडर प्रेसिडेन्ट उमा सिंह,इंटरनॅशनल स्विमर,रनर,सायक्लीस्ट निता बोरसे,माहेरवाशिण संस्थेच्या संस्थापिका प्रभाताई शिर्के,शिक्षण व सामाजिक क्षेत्रात कार्यरत,शाळा व महाविद्यालयांमध्ये वक्ता म्हणून प्रसिद्ध असणा-या आरती बनसोडे,अन्टीपायरसी सेलचे मुख्य तपाशी अधिकारी रामजित गुप्ता उपस्थित होते.श्रुती उरणकर यांना राज्यस्तरीय राजमाता जिजाऊ गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!