ताज्या घडामोडी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त दसरा चौक येथे प्रबोधन संमेलन

Spread the love

कोल्हापूर – १ एप्रिल – भारत मुक्ती मोर्चा व छत्रपती क्रांती सेनेच्या संयुक्त विध्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा 2 एप्रिल 1894 रोजी झालेल्या राज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक – 2 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत दसरा चौक,कोल्हापूर येथे जाहीर प्रबोधन संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे करणार आहेत तर अध्यक्षता बहुजन नायक वामन मेश्राम साहेब राष्ट्रीय अध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चा,नवी दिल्ली हे करणार आहेत.
प्रमुख उपस्थितीमध्ये मा.टी.व्ही.नलवडे (माजी न्यायमूर्ती,हायकोर्ट,मुंबई), मा.इंद्रजीत सावंत (प्रसिद्ध इतिहास संशोधक) , मा.वसंतराव मुळीक (राष्ट्रीय उपाध्यक्ष,मराठा महासंघ, नवी दिल्ली), मा.बबनराव रानगे (मल्हार सेना प्रमुख,महाराष्ट्र ) मा.प्राचार्य जे.के.पवार (संस्थापक,शाहू अध्यासन केंद्र,कोल्हापूर ), मा.राजू आवळे (प्रदेश प्रवक्ता,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार,कोल्हापूर ) मा.डी.आर.ओहोळ (राष्ट्रीय प्रधान महासचिव,बामसेफ,नवी दिल्ली), मा.श्रीकांत होवाळ (प्रदेशाध्यक्ष,बहुजन मुक्ती पार्टी, महाराष्ट्र)
मा.मनोज महाले (राज्य प्रभारी,छत्रपती क्रांती सेना,महाराष्ट्र), मा.प्रतिभाताई उबाळे (प्रदेशाध्यक्ष,भारत मुक्ती मोर्चा,महाराष्ट्र), मा.उदयसिहं पोवार, मा.भाई भरत पाटील,मा.शिवराजसिंह गायकवाड,मा.रामराजे कुपेकर,मा.तात्यासाहेब कांबळे, मा.संजयभाऊ सावंत हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.राजर्षी छत्रपती शाहू महाराज राज्याभिषेक झाला ही एक क्रांतिकारी घटना आहे कारण त्यामुळेच ५० % आरक्षणाचा वटुकूम काढू शकले, कोल्हापूरला वसतिगृहांचे माहेरघर ओळख निर्माण करून देऊ शकले, वेदोक्ताचा लढा लढू व जिंकू शकले, माणगाव परिषदेतून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना देशाचा नेता घोषित करून भारतीय संविधानाची पायाभरणी करु शकले, इंग्रजांकडे जातवार प्रतिनिधित्वाची मागणी करू शकले, राधानगरी धरण बांधू शकले… या व यासारख्या असंख्य गोष्टी महाराज करू शकले कारण ते राजे झाले असे प्रतिपादन भारत मुक्ती मोर्चाचे राज्य प्रचारक श्रीकांत होवाळ यांनी केले.तसेच मूलनिवासी बहुजन समाजातील बंधू भगिनींनी या ऐतिहासिक प्रबोधन संमेलनाद्वारे या क्रांतिकारी घटनेचे स्मरण करण्यासाठी व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना त्रिवार अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने हजर राहून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी नानासाहेब चव्हाण, महेश बावडेकर, तुषार मोतलिंग, मदन सरदार, यल्लपा हरळे , इंदिरा पटवर्धन, प्रशांत हावळ , सागर सुतार ,उमाजी जाधव,सुजाता कांबळे, मुनिर हजारी, ऍड.संतोष नवलाज,सागर शिंदे, अजय घाटगे, इम्रान खतिब, कुलदीप जोगडे,राहुल कांबळे, आयेशा नदाफ,ऍड.किरण कांबळे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!