ताज्या घडामोडी

आर. के. बीएड व डी. एड. महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Spread the love

मुंबई – भांडुप पश्चिम येथील सिद्धिविनायक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलातील कै श्रीराम खानविलकर सभागृहात आर. के. बी. एड व डी. एड. महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्र, शालेय व्यवस्थापन पदाविका अभ्यासक्रम, एम ए ,(शिक्षणशास्त्र)टिळक महाराष्ट्र विद्यापीठ अभ्यासक्रम केंद्र यांचा संयुक्तपणे वार्षिक स्नेहसंमेलन व कला क्रीडा महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कै. श्रीराम खानविलकर यांची दिनांक ३० मार्च रोजी पुण्यतिथि निमित्त आदरांजली करण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. वामन नाखले जे. जे. टी. विद्यापीठाचे डिन डॉ.नायकुडी, महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षण संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष श्री ज्ञानदेव हांडे, राजाराम शेठ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ रश्मी खानविलकर, सनग्रेस हायस्कूलचे संचालक श्री भालचंद्र दळवी शिक्षक संघटनेचे सचिव दत्तात्रय शेंडकर आदी मान्यवर उपस्थित होते. सर्व उपस्थितानी विद्यार्थ्यानी व शिक्षकांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची प्रशंसा केली.
शैक्षणिक संकुलाचे संस्थापक संचालक श्री रमेश खानविलकर यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले शैक्षणिक वर्षात विशेष प्राविण्य संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना रमेश खानविलकर म्हणाले की प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रशिक्षकांनी आपले काम प्रामाणिकपणाने व मनापासून करावे, अनिष्ट बाबीला सक्त विरोध करावा आपल्या हातून दर दिवशी चांगलेच काम होईल, जे काम समाजाला उपयोगी पडेल असे करावे. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विद्यार्थ्यांन सोबत प्राचार्य खिलौनी राऊळकर प्रा.श्री परदेशी सर, प्रा. श्री रुपेश तांबे , प्रा.श्री रिद्धेश खानविलकर ,श्री निखिल शेर्लेकर यांनी विशेष परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!