ताज्या घडामोडी

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ महाराष्ट्र राज्याच्या महासचिवपदी सांगोला येथील प्रशांत लवटे यांची निवड

Spread the love

सांगोला (तालुका प्रतिनिधी)

ऑल इंडिया धनगर समाज महासंघ महाराष्ट्र राज्याच्या महासचिवपदी सांगोला येथील प्रशांत लवटे यांची निवड करण्यात आली. नियुक्तीचे पत्र महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रविण काकडे यांनी दिले आहे.धनगर समाजाच्या हिताचे संवर्धन करण्यासाठी प्रशांत लवटे अनेक वर्षे कार्यरत आहात. समाजाचे हित जोपासण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्नशील आहेत. धनगर समाजाचे संवर्धन आणि समाजहिताचे रक्षण व्हावे या हेतूने राष्ट्रीय पातळीवर पोटशाखा भेद, प्रांतभेद, भाषाभेद, बाजूला ठेऊन धनगर समाज एक होत आहे. या राष्ट्रीय प्रवाहात सहभागी.होवून आणखी विस्तारीत कार्यक्षेत्र उपलब्ध व्हावे, यासाठी प्रशांत लवटे यांची ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या महाराष्ट्र राज्य महासचिवपदी निवड झाली आहे. प्रशांत लवटे यांची निवड झाल्याबद्दल सांगोला तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!