ताज्या घडामोडी

कोल्हापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर प्रशांत पुजारी यांची निवड

Spread the love

गारगोटी, ता. २२ (प्रतिनिधी) –

कोल्हापूर जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या कोअर समितीवर गारगोटी येथील प्रशांत शरद पुजारी यांची निवड झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून या निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे.श्री पुजारी हे गेल्या २० वर्षांपासून ग्राहक चळवळीत काम करत असून वीज विषयाचे अभ्यासक, तज्ञ म्हणून त्यांनी महावितरण कोल्हापूर झोनच्या वीज ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचात देखील ज्युडिशियल सदस्य म्हणून काम करून वीज ग्राहकांच्या बाजूने असंख्य निकाल दिलेले आहेत. तसेच यापूर्वीही जिल्हा ग्राहक संरक्षण प परिषदेत अशासकीय सदस्य म्हणून काम करून ग्राहकांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. यामुळे त्यांची फेरनिवड करण्यात आली आहे. या म कामी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रताध्यक्ष, प्रांत संघटक, प्रांत सचिव, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष, जिल्हा संघटक यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!