ताज्या घडामोडी

उष्माघात टाळण्यासाठी पालघर आरोग्य विभागामार्फत जनतेला काळजी घेण्याचे आवाहन

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी
पालघर जिल्हयात मार्च पासूनच उन्हाचा तडाख जाणवू लागला आहे, एप्रिल, मे मध्ये उष्णतेत आणखी वाढ होऊन उष्माघाताचा धोका वाढू शकतो,त्याअनुषंगाने उष्माघाताचा धोका होऊ नये म्हणून नागरीकांनी स्वत:ची काळजी घेण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा अवलंब करायला हवा, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य विभागाने केले आहे.

उष्माघाताची लक्षणे

• त्वचा लाल होणे, वेदना होणे, सुज येणे, उष्णतेमुळे स्नायूमध्ये गोळे येणे.
•ताप, डोके दु:खी, खुप घाम येणे, थकवा येणे, चक्कर येणे, पोटात मुरडा येणे. इ.
• त्वचा थंडगार व कोरडी होणे, नाडीचे ठोके वाढणे/ मंदावणे
• कधीकधी अर्धवट शुध्द हरपणे

*खालील व्यक्तींना उष्णेतेचा त्रास होण्याची दाट शक्यता असते*

• उन्हात बाहेर कष्टाची कामे करणारे, कारखान्यात बॉयलर जवळ काम करणारे, काच कारखाण्यातील काम करणारे कामगार, वृध्द लोक व लहान मुले

• स्थूल देहयष्टी असणारे, घट्ट व अयोग्य कपडे घालणारे, पुरेशी झोप न होणारे

• गरोदर महिला, लहान बालके, उन्हात खेळणारी मुले
• अनियंत्रित मधूमेह, ह्रदयरोग असलेले लोक, अपस्मार रुग्ण व दारुचे व्यसन असलेले लोक
• काही विशिष्ट औषधे घेणारे लोक
• निराश्रित, घरदार नसलेले गरीब लोक

*सार्वजनिक ठिकाणी उघ्माघात होऊ नये या करीता प्रतिबंधात्मक उपाय*

• सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था – बस स्टँड, रेल्वे स्टेशन, बाजारपेठा, धार्मिक ठिकाणे, बँका, पेट्रोल पंप, मुख्यरस्ते इ.ठिकाणी
• उन्हात लोकांना विश्रांतीसाठी थंड सावलीच्या जागा निर्माण करणे.
• बागा, धार्मिक ठिकाणे, धर्मशाळा दिवसभर खुल्या ठेवणे
• टेरेसना उष्णता विरोधक रंग लावणे
• कार्यालये, शाळा, महाविद्यालये यांच्या कामाच्या वेळा बदलणे
• उष्णतेपासून संरक्षण कसे करावे या बाबत लोकांना आरोग्य शिक्षण देणे

*उष्णतेपासून वचाव करण्यासाठी काय करायला पाहिजे व काय करु नये*

• *हे करा*
* पुरेसे पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा
* हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा
* उन्हात गॉगल, छत्री, पादत्राने वापरा
* उन्हात जातांना टोपी/ हॅटखाली ओलसर कपडा ठेवा.
* पाळीव प्राण्यांना सावलीत/ थंड ठिकाणी ठेवा
* ओलसर पडदे, पंखा, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा

• हे करु नका
* शक्यतो उन्हाच्या वेळेत घरा बाहेर जाणे टाळा.
* उन्हात कष्टाची कामे करु नका
* पार्क केलेल्या वाहणात लहान मुलांना ठेवू नका
* गडद रंगाचे, तंग कपडे वापरु नका
* उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा, स्वयंपाक घर हवेशीर ठेवा.
*मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रींक्स घेऊ नका
* खुप प्रथिनयुक्त व शिळे अन्न खाऊ नका.
*जागरुक रहा.

जिल्हयातील जनतेला उष्माघाताचा त्रास होऊ नये या करीता त्यांनी स्वत्:ची काळजी घ्यावी, आरोग्य यंत्रणे मार्फत उष्माघात प्रतिबंध कसा करावा, उपचार कोठे व कसे मिळतील या बाबत आरोग्य शिक्षण देण्यात येते, उष्माघात प्रथमोपचार, नियंत्रण, रुग्ण व्यवस्थापन या बाबीच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व उपकेंद्र, प्रथमिक आरोग्य केंद्र स्तरावर औषधे व साधन सामुग्री सुसज्ज ठेवण्यात आली आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष चौधरी यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!