ताज्या घडामोडी

अमळनेर तालुका भडगांव आर.टी.ओ. ऑफीसला न जोडता पुर्ववत जळगांव येथेच सुरु / जोडणे ठेवणेबाबत मागणी

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एसएम पाटील
मा.उपविभागीय अधिकारी अमळनेर* *यांना दिले मागणीचे निवेदन
अमळनेर तालुका भडगाव आरटीओ कार्यालयाला न जोडता पूर्ववत जळगाव येथे सुरू ठेवणे बाबत मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी अमळनेर भाग अमळनेर यांना आज नागरिकांच्या वतीने देण्यात आले.अमळनेर तालुका हा पुर्वीपासूनच जळगांव जिल्हा असल्या कारणाने आर.टी.ओ. साठी सुरु होते. पण शासनाने जिल्ह्यात भडगावं येथे नविन विभागीय आरटीओ ऑफिस निर्माण केल्याने अमळनेर हे भडगावं तालुक्यातील आर.टी.ओ. ऑफीसला जोडण्यात आलेले आहे.

पण अमळनेर तालुक्यातील नागरीकांची गैरसोय होणार आहे. कारण भडगांव येथे जाण्या-येण्यासाठी पाहिजे तशी सुविधा नाही. तसेच जळगांव हे जिल्हयाचे ठीकाण असून सर्वसामान्य लोकांचे इतर कामे जसे की कलेक्टर पोलीस अधीक्षक व इतर महत्त्वाचे ऑफिस चे कामे देखील एकाच दिवशी एकाच ठिकाणी करु शकतात. तसेच येजा करण्यासाठी रेल्वे, बस व इतर सुविधा मुबलक असल्याने जळगांव हे गैर सोईचे होत नाही. आता हे असे झाले की नवीन वाहन जळगांव येथील शोरूम मध्ये घ्यावे लागेल व त्याला पासिंगसाठी भडगांव येथे घेवून जावे यावे लागेल. त्यानंतर नागरिकांना अमळनेर ला यावे लागेल ,यामुळे नागरीकांचे आर्थीक तसेच वेळेचे, व मानसिक शारिरीक त्रासाला सामोरे जावे लागेल- म्हणुन यासाठी अमळनेर तालुका हा पुर्ववत जळगांव आर. टी. ओ. जोडण्यात यावे ,अन्यथा आम्हांला नाईलाजास्तव तिव्र अंदोलन करण्यात येईल,
अशी मागणी सर्व नागरिकांच्या वतीने करण्यात आली त्यात खालील प्रमाणे कार्यकर्ते सामील झालेत
श्री. सचिन बाळु पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेस तालुकाध्यक्ष, अमळनेर
. अनंत रमेश निकम, शिवसेना उपशर प्रमुख, अमळनेर
श्री. कुणाल सुर्यवंशी
दुर्गेश सुभाष पवार
सचिन निंबा वाघ
महेश प्रकाश ढाकरे
किशोर नारायण पाटील
नाना शंकर पाटील
नारायण रावा पाटील
नरेंद्र हनुमंत पाटील
शकील नजीर मुजावर
कैलास भीका पाटील
शालीक प्रल्हाद साळुंखे
सुशील शांताराम सोनार
प्रकाश पंढरीनाथ पाटील
संभाजी नारायण पाटील
अमित रवींद्र जगताप
मदन मोहन पाटील
अनिल साहेबराव पाटील
कैलास विष्णू कांबळे
इम्रान खान हबीब पठाण
गोपाळ श्रीकृष्ण वानखेडे
धनराज भटू पाटील किशोर हिलाल पाटील वरील प्रमाणे मागणीच्या निवेदन दिले असून त्याबाबत तातडीने कारवाई होण्याची मागणी केलेली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!