ताज्या घडामोडी

कोल्हापूर सुपर किंग्ज संघ ठरला ‘गवळी प्रीमियर लीग’चा विजेता

Spread the love

मुंबई- गवळी समाज प्रतिष्ठानच्यावतीने मुंबईतील गोदरेज मैदान,करीरोड येथे नुकतीच गवळी प्रीमियर लीग- २०२४ ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.या संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट समाजातील होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणे हे आहे.त्याच अनुषंगाने गवळी प्रीमियर लीग या उपक्रमाचे आयोजन केले होते.

यावर्षी महाराष्ट्रातील एकूण १६ गवळी संघानी यात सहभाग घेतला तसेच अंतिम फेरीत कोल्हापूर सुपरकिंग्ज व खेड खिलाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळाली.कोल्हापूर संघाने १० गडी राखून दणदणीत विजय मिळवला.तर मालिकावीर विश्वास दळवी, उत्कृष्ट फलंदाज पवन केळस्कर,उत्कृष्ट गोलंदाज सुशांत हाप्पे ठरले.या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष निलेश तुकाराम गवळी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारणी सदस्य व स्पोर्टस कमिटीच्यावतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना खासदार अनिल देसाई,अरविंद सावंत, आमदार सचिन अहिर,
अजय चौधरी,नगरसेविका गीता गवळी,युवासेना कार्यकारणी सदस्य पवन जाधव,महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्ट चे अध्यक्ष अजय बिरवटकर,टाटा हॉस्पिटलचे युनिट अध्यक्ष तुकाराम गवळी तसेच गवळी समाजातील अनेक संस्थांचे मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!