ताज्या घडामोडी

पी.व्ही.पी. महाविद्यालयामध्ये एक दिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद

Spread the love

कवठेमहांकाळ : दि. १९ (प्रा. विजय कोष्टी)
येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालयामध्ये अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि संशोधन विकास कक्ष (रिसर्च डेवलपमेंट सेल) यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, (दि. २१ मार्च) रोजी, ’विज्ञान,वाणिज्य आणि मानव्य शास्त्रातील बहुशाखीय संशोधन जोडणाऱ्या सीमा’(ब्रिजिंग बॉउंडरीज: मल्टीडिसीप्लीनरी रिसर्च इन सायन्स, कॉमर्स अँड ह्यूमानीटीज’ (ऑनलाइन माध्यम) एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन प्रमुख अतिथि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव सुदर्शन शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एम. के. पाटील यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती परिषदेचे निमंत्रक प्रा. नितीश शिंदे आणि समन्वयक प्रा. अविनाश कांबळे(नॅक समन्वयक ) व प्रा. अमर पवार यांनी दिली. त्यानंतर गोवा येथील डॉ. दादा वैद्य शिक्षण शास्त्र महाविद्यालयाच्या डॉ. अण्णा निना जॉर्ज यांच्या बिजभाषणाने आणि प्राचार्य डॉ. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली परिषदेस सुरुवात होईल. पहिल्या सत्रा मध्ये सेंटर फॉर इंग्लिश स्टडीज, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी न्यू दिल्ली येथील डॉ. मिलिंद आव्हाड यांचे व्याख्यान शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या इंग्रजी विभागातील प्रा. डॉ. ए. एम. सरवदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. दुसऱ्या सत्रामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे डॉ. दिलीप चव्हाण यांचे व्याख्यान वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स (स्वायत्त) सोलापूरचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.भोजन अवकाशानंतर संशोधन पेपर सादरीकरण सत्रा मध्ये शिराळा महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक प्रमोद पाटील, आटपाडी महाविद्यालयाचे सहायक प्राध्यापक अभय देशमुख इत्यादींचे संशोधन लेख सादर होणार आहेत. निरोप सत्रासाठी शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्रमुख डॉ. प्रभंजन माने उपस्थित राहणार आहेत. सल्लागार समितीमध्ये शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षा चे संचालक डॉ. एम. एस. देशमुख, वाणिज्य आणि व्यवस्थापन चे डीन प्रा. डॉ. एस.एस. महाजन, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ. पी. बी. माने, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अशोक बाबर आणि माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विशाल शिंदे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभणार आहे. सह समन्वयक म्हणून डॉ. भगवान मोहिते, डॉ. मयूर शिंदे, डॉ. सुरेन्द्रनाथ बाबर, प्रा. महेश कांबळे, प्रा. पूजा माळी, प्रा. हरिप्रसाद पवार काम पाहणार आहेत. परिषदेसाठी दिलेल्या विषया वरील अनेक संशोधन लेख सादरीकरणा साठी आले असून ते प्रसिद्ध करण्याचीही व्यवस्था करणेत आली आहे. तरी शिक्षक, विद्यार्थी, संशोधकांनी आपले संशोधन लेख परिषदेपूर्वी पाठवावेत असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!