ताज्या घडामोडी

सूर्यवंशी (कुणबी) क्षत्रिय ज्ञातीहितवर्धक मंडळा तर्फे मोफत वैद्यकीय शिबीर

Spread the love

वैभव पाटील : प्रतिनिधी

पालघर तालुक्यातील नावजे गटातील तांदुळवाडी गावी सूर्यवंशी क्षत्रिय( कुणबी )ज्ञाती मंडळातर्फे स्व.मानकायताई माणिकराव ठाकूर स्मरणार्थ व स्व. वामन शामराव कोरे विशेष सहाय्य अंतर्गत मोफत वैद्यकीय शिबिर मंडळाचे अध्यक्ष संतोष पावडे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. 17 मार्च रोजी संपन्न झाला.या शिबिराचे उद्घाटन तरुण उद्योजक अमेय नागेश राऊळ यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ मंडळास 2 लाख रुपयांची देणगी दिली .तर प्रमुख पाहुणे टी.डी. सी.बँक संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते नागेश गजानन पाटील यांनी भोजन व्यवस्था केली होती.आई अमृत फाऊंडेशन अध्यक्ष मनोजकुमार घरत यांनी मोफत चष्मे साठी निधी जातो. या मोफत शिबिरासाठी अधिकारी लाईफ बोईसर चे मनोज विनोद अधिकारी यांनी ECG व नेत्र तपासणी साठी मोफत यंत्रना उपलब्ध करून दिली व 51 हजार रुपयांची देणगी मंडळास दिली .तर माजी सल्लागार प्रकाश राऊत यांनी कॅन्सर तपासणी उपलब्ध करून दिली.या शिबिरात विविध आजारावरील 150 रुग्णांनी लाभ घेतला.
शिबिरासाठी लागणारी औषधे सल्लागार प्रफुल्ल साने,प्रकाश राऊत,नरेश कोरे यांच्या मदतीने विविध फर्मसिटिकल कंपनीने पुरवली. शिबिरासाठी समाजातील M.D,M.B.B.S,BAMS डॉक्टर्स,नर्सेस, फार्म सी स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता.डॉक्टरनी सेवाभावी रीतीने आजची सेवा पुरवली.मंडळाचे आजी,माजी पदाधिकारी,महिला संघटक, कार्यकर्ते,मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिबिर यशस्वी करण्यासाठी शिबिर प्रमुख हितेश पाटील, नावजे गटातील आणी तांदुळवाडी व लालठाणे गावातील कार्यकर्ते ,समाज बंधू भगिनी यांनी मोठे योगदान दिले. परिसरातील जनतेने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून शिबिराचा फायदा घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!