ताज्या घडामोडी

श्री विलास मारूती महाडीक यांच्या सेवानिवृत्तिनिमित सत्काराचे आयोजन

Spread the love

सांगली, दि: 16 रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य, रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिल माजी सदस्य ,माध्यमिक विभागाचे सहसचिव विलास मारूती महाडीक हे ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त होत असून त्यांचा सपत्नीक सत्कार समारंभ शनिवार दिनांक २३मार्च २०२४रोजी सकाळी १०:००वाजता विद्यालयात आयोजित करण्यात आला आहे.
हा सत्कार समारंभ शिरोळ नगरपालिका नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव प्राचार्य बी. एन. पवार, दक्षिण विभाग चेअरमन एम. बी. शेख हे आहेत तर रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग सांगलीचे माजी चेअरमन माधवराव मोहिते, दक्षिण विभाग विभागीय अधिकारी विजयकुमार हणशी, सहाय्यक अधिकारी उत्तम वाळवेकर, अँन्थोनी डिसोझा, कमलाकर महामुनी, जे. के.मोरे,बी.एस.नायकवडी,एस.टी.पवार यांची उपस्थिती लाभणार आहे.
प्राचार्य व्ही. एम. महाडीक यांनी संस्थेच्या आदिवासी भागातील चांग्याचा पाडा येथे विनाअनुदानित तत्वावर नियुक्ती स्वीकारुन प्राचार्य म्हणून काम करत असताना संस्थेत जांभुळणी, भवानीनगर, शिरोळ ,आष्टा ता वाळवा येथे आपल्या कामाचा ठसा उमटवला.रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक शिक्षण विभागाचे सहसचिव म्हणून निवड झाल्यानंतर अनेक उपक्रम राबविले आणि शताब्दी महोत्सव साजरा करुन नावलौकिक प्राप्त केला. साधी राहणी, उच्च विचारसरणी, वात्सल्य, जिव्हाळा व सर्वांना सामावून घेण्याची क्षमता असलेल्या महाडीक सर यांना दीर्घायुष्य लाभावे हि कर्मवीर चरणी प्रार्थना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!