ताज्या घडामोडी

श्रीरामपूर शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन

Spread the love

प्रहार जिल्हा प्रमुख अभिजीत पोटे यांच्या श्रीरामपूर शहर संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

ना.बच्चु कडू यांचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची बांधणी करण्याचे आदेश : अभिजीत पोटे

सत्ता असो अथवा नसो श्रीरामपूर मतदार संघात प्रहारचे भरीव कार्य : अभिजीत पोटे

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील सर्वसामान्य प्रहारची छाप : अभिजीत पोटे

श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाला जोडणाऱ्या 32 विसंगत गावांना न्याय मिळवून देऊ : अभिजीत पोटे

शेतकरी कष्टकरी कामगार निराधार दिव्यांग
16 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता श्रीरामपूर शहरांमध्ये बेलापूर रोडवर प्रहार जिल्हा प्रमुख अभिजीत पोटे यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन जगाला अन्न पुरवणार शेतकरी देशाचे अहोरात्र सेवा करणारा सैनिक आणि दिव्यांग बांधवांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले
श्रीरामपूर विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात प्रहार सेवक आपल्या दारी राहुटी अभियान सुरू आहे या अभियाना दरम्यान सर्वसामान्य नागरिक अनेक शासकीय लाभांपासून व योजनांपासून वंचित असल्याचे निदर्शनास आले श्रीरामपूर विधानसभा क्षेत्रातील लोकप्रतिनिधींनी आजपर्यंत जो विकास करायला हवा होता तो केला नसल्याचे स्पष्ट झाले आहे केवळ जनतेकडे वोट बँकिंग म्हणून बघितले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे प्रहार सेवक आपल्या दारी राहुटी अभियानाच्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित वंचित गरजवंत ज्येष्ठ नागरिक दिव्यांग विधवा अनाथ सामान्य नागरिक शेतकरी या घटकांपर्यंत प्रहार सेवक स्वतः जाऊन त्यांच्या समस्या जाणून सोडवत आहेत त्यामुळे जनसामान्यांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षा बाबत विश्वास निर्माण झाला आहे त्या विश्वासाची दखल घेत ना .बच्चुभाऊ कडू यांनी श्रीरामपूर विधानसभा मतदार संघाची बांधणी करण्याचे आदेश जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांना दिलेले आहेत श्रीरामपूर विधानसभा स्वबळावर लढवणार असल्याचे आदेश प्रहार सैनिकांना मिळाल्याने ताकतीने प्रहार सैनिक सक्रिय झाले आहेत या मतदारसंघात सर्वात जास्त शाखा असणारा प्रहार जनशक्ती पक्ष आहे राहुरी तालुक्याची श्रीरामपूर विधानसभा क्षेत्राला जोडलेल्या 32 गावातील नागरिकांच्या समस्या व मतदार संघ विभाजनामुळे झालेली गैरसोय आणि शासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या विसंगत धोरणामुळे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी 32 गावांमध्ये प्रहार कार्यालय करणार असल्याचे याप्रसंगी सांगितले आज पर्यंत कार्यालय नसताना देखील मतदार संघात नामदार बच्चुभाऊ कडू यांच्या माध्यमातून पन्नास वर्षापासून रखडलेले अनेक लोखंडी पुलांची निर्मिती केली मुसळवाडी नऊगावे पाणी योजनेसाठी आंदोलन करून नागरिकांना हक्काचे पिण्याचे व शेतीचे पाणी मिळण्यासाठी प्रहारने आवाज उठवल्याने निधीची तरतूद झाली आहे तसेच श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान साठी पिण्याचे व शेतीचे पाणी आरक्षित करून जलद गतीने टेल टॅंक भरण्यासाठी टेल त्यांच्या दरवाजाला मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे तसेच देवळाली प्रवरा हद्दीतील प्रसाद नगर भागात 50 वर्ष पासून पिण्याच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या शेकडो कुटुंबांना हक्काचे पिण्याचे पाणी आंदोलन करून घरापर्यंत उपलब्ध करून दिले आहे प्रसाद नगर येथील बंद दगड खान जागेत खासबाब प्रस्ताव करून यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत घरकुलांची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे अनेक विधवा भगिनींना शिलाई मशीन व हातगाडीचे वाटप करून त्यांना स्वयंरोजगार उपलब्ध करून दिला आहे देवळाली मध्ये राज्यातील पहिला विधवा विवाह लावून राज्यात पायंडा घालून दिला देवळाली प्रवरा पाणी योजनेचा कित्येक वर्षापासून वाया जाणाऱ्या आणि चोरी होणाऱ्या पाण्याचा घोटाळा उघड केला असल्याने हजारो नागरिकांची पाणीपट्टी कमी झाली आहे कित्येक कोटी रुपयांचे थकीत ऊस बिले प्रहारच्या दणक्याने काही तासात मिळून दिले आहेत दिल्लीतील चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला समर्थन आणि स्वामीनाथन आयोग आणि शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी राज्यात प्रथमच नेवासा ते श्रीरामपूर प्रभू श्रीराम मंदिरापर्यंत भव्य पाचशे ट्रॅक्टर ट्रॉली मोर्चा काढण्यात आला सध्या चर्चेत असलेला कोपरगाव राहता श्रीरामपूर तीन विधानसभा मतदारसंघाला जोडणारा तसेच जगप्रसिद्ध श्रीक्षेत्र शिर्डी ते शनिशिंगणापूरला जोडणारा अति महत्त्वाचा दत्तनगर ते धनगरवाडी फाटा वाकडी गणेश नगर राहता ते शिर्डी कित्येक वर्षापासून त्रस्त असणाऱ्या जनतेसाठी जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समिती बैठक घेऊन शासनाच्या सर्व विभागीय अधिकाऱ्यांना धारेवर धरून खासबाब प्रस्ताव तयार करून शासनाकडे मंजुरीस पाठवला आहे आणि दत्तनगर फाट्यावर रस्त्याला जोडणाऱ्या 21 गावातील नागरिकांचा नागरिकांसह भव्य आंदोलन करून जागेवरच रस्ता कामाची मंजूर निविदा घेऊन उर्वरित रस्त्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींना उपस्थित राहण्यास भाग पाडून जनतेचा प्रश्न मार्गी लावला आहे महाराष्ट्र राज्यातील पहिले दिव्यांग भवन श्रीरामपूर येथे सुरू करण्यात आले तसेच प्रहार श्रीरामपूर विधानसभा क्षेत्राचे प्रमुख आप्पासाहेब ढूस यांनी आतापर्यंत प्रहार जनशक्ती पक्षाचे कुठलेही कार्यालय विधानसभा मतदारसंघात नसताना जनतेच्या समस्या जलद गतीने सोडवल्या आहेत श्रीरामपूर शहरात कार्यालयाची निर्मिती झाल्याने विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे वरिष्ठांच्या आदेशावरून विधानसभा क्षेत्राची बांधणी ताकतीने करणार असल्याचे सांगितले या प्रसंगी कार्यक्रमास प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख अभिजीत दादा पोटे यांचे सह शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ॲड अजित काळे, शेतकरी संघटना राज्य सचिव रुपेंद्र काले, शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रमुख अनील औताडे, प्रहार जनशक्ति पक्षाचे जिल्हा संघटक बाळासाहेब खर्जुले, ज्ञानेश्वर सांगळे, प्रहार धर्मग्रस्त कृती समिती अध्यक्ष कृष्ण सातपुते, प्रहार विधि सल्लागार ॲड औताडे, प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख आप्पासाहेब ढूस, विधानसभा उपप्रमुख लक्ष्मण खडके, प्रहार नेवासा तालुका अध्यक्ष जालिंदर आरगडे, शेतकरी संघटनेचे युवराज जगताप, मेजर गोपीनाथ उगले, प्रहार विधानसभा कामगार सेल प्रमुख बाळासाहेब कराळे, श्रीरामपूर शहर प्रमूख सोमनाथ गर्जे, प्रहार श्रीरामपूर युवक तालुका कार्याध्यक्ष नानासाहेब तागड, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष दीपक पटारे,तालुका संघटक भालके मामा, राहुरी फॅक्टरी शहर उप प्रमूख गणेश भालके, संघटक प्रभाकर कांबळे, इम्रान शेख, संदीप पाखरे, देविदास मनाळ,सुमित राहिले आणि शेकडो प्रहार सैनिक उपस्थित होते जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना माजी सैनिक गोपीनाथ उगले, शेतकरी बांधव साहेबराव चोरमल दिव्यांग लक्ष्मण खडके आणि शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित काळे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!