ताज्या घडामोडी

महात्मा फुले विद्यालयात महिला दिन उत्साहात साजरा

Spread the love

शिराळा प्रतिनिधी :

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून जि प निगडी शाळेच्या आदर्श व उपक्रमशील शिक्षिका करुणा मोहिते मॅडम लाभल्या होत्या.कार्यक्रमासाठी अंत्री बुद्रुक गावच्या महिला सरपंच सौ सुजाता पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्या व इतर महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक प्रशांत कदम होते.करुणा मोहिते यांनी आदर्श विद्यार्थी कसा असावा, पालक म्हणून आई वडिलांची काय भूमिका असावी आणि गुरूच महत्त्व तसेच महिला सबलिकरण, विधवा प्रथा याबाबत अतिशय समर्पक उदा. देऊन मार्गदर्शन केले.महिला दिनानिमित्त प्रहार आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सौ सुनिता गवळी यांचा करुणा मोहिते मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया गवई तसेच प्रास्ताविक पल्लवी वंजारी यांनी केले. ज्येष्ठ शिक्षक राजकुमार थोरात , वसंत चौगुले , वसंत डबाणे सर यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार सरिता जाधव यांनी मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!