ताज्या घडामोडी

बँको पुरस्कार तिसऱ्यांदा प्राप्त करून हॅट्रिक साधली.:- डॉ. श्रीकांत चव्हाण

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित इस्लामपूर ला ठेवी ८० ते १०० कोटी या विभागात मध्ये बँको पतसंस्था ब्ल्यू रिबन – २०२३ विशेष पुरस्कार जाहीर झाला अशी माहिती बँको चे मुख्य संपादक अविनाश शिंत्रे – गुंडाळे व इनमा चे संचालक अशोक नाईक यांनी दिली.
महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला बळकटी आणणाऱ्या पतसंस्थांना त्यांच्या कार्यास प्रोत्साहन मिळावे तसेच याच कामाचा भाग म्हणून प्रामाणिक आणि चोख काम बजावणाऱ्या, सरकारी कायदे आणि नियमांची चौकट सांभाळून प्रगती साधणाऱ्या पतसंस्थांचा हुरूप तसेच कार्यक्षमता वाढविणे ह्या हेतूने अविज पब्लिकेशन, कोल्हापूर आणि गॅलेकसी इनमा, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने ” बॅको पतसंस्था सहकार परिषद २०२४ व बॅको ब्ल्यू रिबन २०२३ चे आयोजन केले आहे.
हा पुरस्कार डेल्टीन रिसॉर्ट, नानी दमण, दमण आणि दीव येथे संपन्न होत असलेल्या राज्य स्तरावर वरील सहकार परिषदेत दिला गेला आहे.
हा कार्यक्रम १३ ते १४ फेब्रुवारी २०२४ रोजी संपन्न झाला आहे. श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित., उरुण – इस्लामपूर या सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र शासनाचा सहकारभूषण पुरस्कार प्राप्त पतसंस्थेने यापूर्वी सन २०२० ला ठेवी ६० ते ७५ कोटी या विभागात तृतीय क्रमांक , सन २०२१ ला ठेवी ७० ते ९० कोटी विभागात प्रथम क्रमांक, सन २०२३ ला ८० ते १०० कोटी या विभागात राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकावला आहे. श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्थेने बँको पुरस्कार तिसऱ्यांदा पटकावला.
यावेळी पतसंस्थेचे चेअरमन डॉ श्रीकांत चव्हाण बोलताना म्हणाले, हा पुरस्कार पतसंस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, सर्व संचालक मंडळ, सेवक वर्ग आणि धनवर्धिनी एजंट यांच्या सामूहिक प्रयत्न याचे फलित आहे. सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन. श्री दत्त नागरी सहकारी पतसंस्थेचे कुटुंबप्रमुख, आधारवड, इस्लामपूर शाखा प्रमुख, संस्थापक चेअरमन डॉ पी बी कुलकर्णी, प्रधान शाखा प्रमुख, संचालक दिनेश हसबनीस, सहाय्यक कार्यलक्षी संचालक महेश कबाडे, ग्राहक संपर्क अधिकारी अरविंद जाधव यांनी बॅको ब्ल्यू रिबन २०२३ पुरस्कार स्वीकारला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!