ताज्या घडामोडी

यशवंत सहकारी ग्लुकोज कारखान्याच्या चेअरमन पदी रणधीर नाईक तर व्हॉईस चेअरमन पदी आनंदराव पाटील पुन्हा एकदा बिनविरोध

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

सिध्देश्वरनगर ता. शिराळा येथील कारखाना कार्यस्थळावर माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत व निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक बी. के. पाटील, कार्यालयीन अधीक्षक विकास माळी यांच्या देखरेखीखाली या निवडी पार पडल्या.
यानिमित्ताने झालेल्या कार्यक्रमात बोलताना शिवाजीराव नाईक म्हणाले, उद्योग समूहातील सर्व संस्था आता पूर्वपदावर येत आहेत. आपली ताकद एक कुटुंब म्हणून अभेद्य आहे. ती ताकद पुढील वाटचालीत देखील कायम ठेवू. शेतकरी, सभासद, कर्मचारी यांनी धीराने काम केले आहे. नूतन पदाधिकाऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून चांगली किंमत देणारी उत्पादने बाजारात आणण्यासाठी प्रयत्न करावेत.
चेअरमन रणधीर नाईक म्हणाले, सभासदांच्या सहकार्याने संचालक मंडळ आणि चेअरमन व्हा. चेअरमन निवडी बिनविरोध पार पडल्या. येणाऱ्या काळात कारखान्याची आणखी प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे. कारखाना आदर्श बनवून वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी सर्वांच्या समन्वयातून काम करणार आहोत. कारखाना अडचणीत असताना सहकार्य केलेल्या प्रत्येक घटकाचे ऋण फेडण्यासाठी कटिबद्ध आहोत. नजीकच्या काळात नवीन पदार्थांची निर्मिती करण्यावर भर देण्यात येणार आहे. टप्या टप्प्याने आपल्या उद्योग समूहातील सगळ्या संस्था सुरळीत होऊन पूर्व पदावर येत आहेत.
यावेळी स्वागत प्रास्ताविक सुखदेव पाटील यांनी केले. नूतन संचालकांचा सत्कार करण्यात आला. इस्लामपूर बाजार समितीचे संचालक सी. एच. पाटील, के. वाय. भाष्टे, डॉ. एस. व्ही. पाटील, एस. के. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ नेते एम. एस. कुंभार, सुभाष (गजानन) घोडे पाटील, सत्यजित नाईक, राजन पाटील, बाळासो पाटील, प्रकाश पाटील, एन. डी. लोहार, अर्जुन पाटील, प्रतापराव जाधव, युवराज यादव, शहाजी पाटील, अशोक शिंदे, अमरसिंह माने, उदयकुमार मुळीक, रघुनाथ पाटील, सौ. उमा शंकर पाटील, सौ. वैशाली रामचंद्र पाटील, सुधीर बाबर, भगवान मस्के, नगरसेवक बंडा डांगे, संदीप चोरगे, पांडुरंग गायकवाड, सागर पाटील, उत्तम पाटील, भीमराव ताटे, भोलासो पाटील, प्रकाश पाटील, सत्यवान पाटील, मोहन पाटील, लक्ष्मण पाटील, विश्वास पाटील, यांच्यासह सर्व संस्थांचे पदाधिकारी सभासद शेतकरी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!