ताज्या घडामोडी

लायन्स क्लब केळवे तर्फे २६ अंगणवाड्यांना शैक्षणिक साहित्य वितरण

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी
मुलांच्या संगोपनाबरोबरच त्यांना हसत खेळत शिक्षणाचा प्रारंभ करणाऱ्या अंगणवाडी बालवाडी म्हणजे प्राथमिक शिक्षकाचा पाया असून हा पाया भक्कम केल्यास निश्चितच एक चांगली पिढी घडते असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते अतुल दांडेकर यांनी केले.

लायन्स क्लब ऑफ केळवे आयोजित अंगणवाडी सेविका मार्गदर्शन व साहित्य वितरण कार्यक्रम नुकताच कालिकामाता मंदिर केळवे येथे पार पडला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले झोन चेअरपर्सन अतुल दांडेकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, समाजातील सर्वात शेवटच्या घटकांपर्यंत पोचून सेवा करण्याचे काम लायन्स क्लब तर्फे केले जात असून लायन्स क्लब ऑफ केळवे ने आतापर्यंत पंचावन्न प्रोजेक्ट यशस्वी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. तर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले शिक्षण अभ्यासक प्रमोद पाटील यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की , नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अंगणवाडी- बालवाडी हा शालेय शिक्षणाचाच एक भाग म्हणून गणला जाणार असल्याने अंगणवाडी- बालवाडी यांना विशेष महत्त्व येणार आहे. त्यामुळे कदाचित भविष्यात अंगणवाडी बालवाडी सेविकांना मानधनासाठी आंदोलन करावे लागणार नाही असे सांगून नवीन शैक्षणिक धोरण २०२० काय आहे हे सविस्तर सविस्तर सांगितले.

याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ मुंबई स्टारचे अध्यक्ष असीम कुमार, कालिका माता मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष विनोद म्हात्रे, जिल्हा परिषद पालघर एकात्मिक बालविकास विभागाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी गौरी धांगडा, केळवे-केळवेरोड बिट च्या मुख्य सेविक सुरेखा सूरवसे, कल्पना पिंपळे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केळवे लायन्स क्लबचे अध्यक्ष हर्षल राऊत होते.

यावेळी केळवे व केळवेरोड बिट अंतर्गत २६ अंगणवाड्यांना एल.ई.डी.ट्युब, मेडीकल किट, १० अंगणवाड्यांना सिलिंग फॅन, २ अंगणवाड्यांना चटई व पालीपाडा अंगणवाडी येथे टि.व्हि. सेट वाटप करण्यात आले.

माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर डाॅ. अजित जैन, सुनील शाह यांच्या सह लायन्स क्लब ऑफ केळवे चे अध्यक्ष हर्षल राऊत, खजिनदार चेतन सावे, प्रकल्प समन्वयक जयप्रकाश तांडेल, प्रियांक राऊत, राजेश राय,नरेंद्र वर्तक, हरिश्चंद्र चौधरी, जयप्रकाश कुंभार व जितेंद्र राऊत उपस्थित होते. यावेळी अंगणवाडी सेविकांनी लायन्स क्लबचे आभार व्यक्त केले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!