ताज्या घडामोडी

पी.व्ही.पी. मध्ये एक दिवशीय ‘स्वयम’कार्यशाळा

Spread the love

कवठेमहांकाळ: दि. (११) (प्रा. विजय कोष्टी)
येथील पद्मभूषण वसंतराव दादा पाटील महाविद्यालय व आर. आर. पाटील महाविद्यालय सावळज प्रमुख अग्रणी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच पी. व्ही. पी. महाविद्यालयात ‘स्वयम (SWAYAM) द्वारे ऑनलाइन शिक्षण’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. सदर कार्यशाळेसाठी साधन व्यक्ति म्हणून डॉ. के. डी. कुचे (समन्वयक, स्वयम, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर) उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक डॉ. एस. एस. शेंडगे व उपस्थितांचे स्वागत प्राचार्य डॉ. एम. के. पाटील यांनी केले. सदर कार्यशाळेमध्ये पी. व्ही. पी. महाविद्यालय व अग्रणी महाविद्यालय परिक्षेत्रात समाविष्ट असलेल्या महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेमध्ये साधन व्यक्ती डॉ. कुचे यांनी ‘एक्सपलोरिंग ऑनलाइन लर्निंग थ्रू स्वयम’ या विषयावर मार्गदर्शन केले तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांना उत्तरे दिली. याप्रसंगी डॉ. कुचे यांनी महाविद्यालयातील नव्यानेच सुरू झालेल्या संख्याशास्त्र विभागाला भेट देऊन संगणक प्रयोगशाळा आणि पुरेशी विद्यार्थिसंख्या पाहून समाधान व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांना भावी शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यशाळेच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुजाता सोलगे आणि डॉ. सरस्वती अंदेलवार यांनी तर कार्यक्रमाचे आभार प्रा. किरण सकट यांनी मानले. सदर कार्यशाळेस शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव सुदर्शन शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पाटील, अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. मोहन लोंढे, कार्यशाळेचे समन्वयक डॉ. एस. एस. शेंडगे, नॅक समन्वयक प्रा. अविनाश कांबळे यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!