ताज्या घडामोडी

महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचातर्फे राज्य स्तरीय सभा पार

Spread the love

भारत कवितके मुंबई कांदिवली.
रविवार दिनांक 10 मार्च 2024 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत शुभम सभागृह गणेश चौक महावीर नगर लिंक रोड जवळ कांदिवली पश्चिम मुंबई येथे महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाची राज्य स्तरीय सभा पार पडली.धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी बाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर समाजाची पुढील दिशा काय असावी? या पार्श्वभूमीवर चर्चा विचारविनिमय करण्यात आला.सभेच्या सुरुवातीला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलीत करण्यात आला.मंचचे खजिनदार पांडुरंग धायगुडे सर यांनी सन 2016 ते सन 2024 पर्यंत चा मंचच्या जमा खर्च व शिल्लक आणि देणे बाकी रक्कम या बाबत माहिती दिली.व दिनांक 4 मार्च पर्यंत जमाखर्च तपासला असल्याचे सांगितले.जर कोणाला शंका असेल त्यांनी मला संपर्क करावा मी त्यांच्या शंकांचे निरसन करीन.मंचचे अध्यक्ष मधुजी शिंदे सर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की,” मी 2010 मध्ये सेवा निवृत्त झाल्यानंतर धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी बाबत 2013 पासून अभ्यास सुरू केला.आपण ही केस पुढे नेऊ शकतो याची खात्री पटल्यावर सन 2016पासून निधी जमा करण्यास सुरुवात करुन कोर्टात केस दाखल केली.आझाद मैदान मुंबई येथे मंचातर्फे जाहीर निर्णय झाला.80 वेळा केसच्या सुनावण्या झाल्या.धनगड अस्तित्वात नाहीत, धनगर अस्तित्वात आहेत.यावर लढत राहिलो,पण आता हे सुप्रीम कोर्टात होणार नाही.याची मी ग्वाही देतो,आपण नक्कीच जिंकू, समाजाची राजकीय क्षेत्रात आपली ताकद वाढवायला हवी.आमदार गोपीचंद पडळकर यांनी खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केले.” गंभीर विषयावरील ही राज्य स्तरीय सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात केस सुप्रीम कोर्टात दाखल करुन जिंकायचीच या इराद्याने सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.मंचच्या पदाधिकारी व समाज बांधवांनी आपलीं लढण्याची तयारी असल्याचे सभागृहात मौखिक व लिखित स्वरूपात दिले.यावेळी मधुजी शिंदे सर डॉ बघेल सर पाचपोळ सर गोपीचंद पडळकर सह अनेक समाजातील मान्यवर उपस्थित होते.सुत्रसंचालन बिरु कोळेकर यांनी करून चित्र पटलावर महाराष्ट्र राज्यातील जिल्हा नुसार धनगर समाजाची संख्या दाखविली,या राज्यस्तरीय सभेला महाराष्ट्र राज्यातील मंचाचे पदाधिकारी, समाजातील डॉक्टर, वकील, इंजिनिअर, पत्रकार साहित्यिक सामाजिक कार्यकर्ते, यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले, दत्तात्रय डांगे, लक्ष्मण व्हटकर, दत्तात्रय यमगर, वैभव गरगडे, भारत कवितके,मोटे सर, इतर अनेक मंडळांचे, संस्था चे पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!