ताज्या घडामोडी

आर्टीच्या माध्यमातून मातंग समाज शैक्षणिक क्षेत्रात प्रगती करणार .. मंत्री अब्दुल सत्तार

Spread the love

सामाजिक संघटनेच्या वतीने मंत्री सत्तार यांचा जाहीर सत्कार

शैक्षणिक विकासासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात बार्टीच्या धर्तीवर आर्टी स्थापन करण्याची घोषणा केली तसेच संगमवाडी पुणे येथील आद्यक्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या स्मारकाचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिपूजन केल्याबद्दल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे क्रांती फोर्स सामाजिक संघटना सिल्लोड तालुका तसेच सकल मातंग समाज यांच्या वतीने सिल्लोड शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात सनई चौघडा, ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला.
महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांचा ए बी एस क्रांती फोर्स सामाजिक संघटना व सकल मातंग समाजाच्या वतीने आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आल
कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस स्मृती दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यासोबतच शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नामफलकास तसेच आद्यक्रांतिगुरु लहुजी साळवे यांच्या प्रतिमेस ना.अब्दुल सत्तार यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी नामदार अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, महायुती सरकारच्या माध्यमातुन ऐतिहासिक निर्णय घेण्याचे काम या ठिकाणी सरकार करत आहे सरकारने बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना केल्यामुळे भविष्यात मातंग समाजाला शैक्षणिक क्षेत्रात त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल तसेच
पुणे संगमवाडी येथे आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक व्हावे अशी मागणी मातंग समाजाची अनेक वर्षांपासून शासनदरबारी प्रलंबित होती ती मागणी महायुती सरकारने पुर्ण करुन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्मारकाचे उद्घाटन केल्याचे मंत्री सत्तार यांनी सांगितले.
महायुती सरकारने आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मरकाचे उद्घाटन केल्याबद्दल तसेच बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना करण्याची घोषणा केल्याबद्दल महायुती सरकारचा प्रतीनिधी म्हणून सिल्लोड तालुक्यातील ए बी एस क्रांती फोर्स सामाजिक संघटना तसेच सकल मातंग समाजाच्या वतीने माझा सत्कार केल्याबद्दल सर्व मातंग समाजबांधवाचे मंत्री सत्तार यांनी आभार मानले.
सामाजिक संघटनेच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांना सिल्लोड शहरासह तालुक्यातील विविध गावांतील मातंग समाजाच्या प्रलंबित विकासकामा संदर्भात निवेदन देण्यात आले असता मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की,सिल्लोड शहरांमध्ये लवकरच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे काम हाती घेण्यात येणार असुन शहरासह ग्रामीण भागातील मातंग समाजाचे शासनदरबारी तसेच गावपातळीवर जी विकासकामे प्रलंबित आहेत ती सर्व कामे टप्प्याटप्प्याने पुर्ण करण्यात येतील.
कार्यक्रमप्रसंगी सिल्लोड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती राजश्री निकम, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, नगरसेविका शकुंतलाबाई बन्सोड, नगरसेवक सुधाकर पाटील, विठ्ठल सपकाळ, सुनील दुधे, डॉ. मच्छिद्र पाखरे, जगन्नाथ कुदळ , भावराव दुधे, फहिम पठाण, कृष्णा वाघ, साचीन पाखरे,विजय खाजेकर यांच्यासह ए बी एस क्रांती फोर्स सामाजिक संघटनेचे जिल्हा निरीक्षक सखाराम अहिरे,सामाजिक कार्यकर्ते संजय अहिरे,संघटनेचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब गायकवाड, संघटनेचे शहर समन्वयक विष्णू सोनवणे, सिल्लोड शहराध्यक्ष साहेबराव सोनवणे,जिल्हा कोषाध्यक्ष सुखदेव कांबळे,तालुकाध्यक्ष बाबुराव अहिरे,युवा तालुकाध्यक्ष फकीरचंद तांबे,शहर उपाध्यक्ष मनोज आहीरे,शहर सचिव रवींद्र महाले,तालुका सचिव साहेबराव अहिरे,शहर संघटक किसन सौदागर ,शहर कार्याध्यक्ष सुनील आहीरे,शहर कोषाध्यक्ष राजेंद्र गोफणे सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल कांबळे,नामदेव खेत्रे,अमोल खेत्रे,विष्णू साळवे, कडूबा मोरे, बाबुराव गायकवाड ,पंढरी दणके, कडूबा चंदनशिवे, नितीन सौदागर , कृष्णा सोनवणे, स्वप्नील सौदागर,सावन खंडागळे,सागर खेत्रे,समाधान आहीरे, संतोष महाले, संदीप कांबळे, अंकुश पाजगे, विशाल आहीरे,अभिषेक सुराशे, नितीन सौदागर,गोपाल सोनवणे, आकाश आहीरे, संतोष आहीरे, सुरेश सोनवणे ,अशोक सोनवणे, दत्ता गोफणे,स्वराज आहीरे,दौलत आहीरे, सुनिल कांबळे, प्रभाकर आहीरे,अक्षय गायकवाड,वंश खेत्रे यांच्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!