ताज्या घडामोडी

सफाळे परिसरातील सामाजिक कार्यकर्त्या महिलांचा जागतिक महिला दिनानिमित्त गौरव

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी
सफाळे येथील राजगुरू ह.म.पंडित विद्यालय येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सफाळे आणि भिमाई महिला मंडळ सफाळे यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व त्यागमूर्ती रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव आणि महिला गौरव दिन सोहळा शुक्रवारी संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष कांबळे होते. या कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख वक्त्या डॉ. प्रियदर्शनी सुशीला भगवान ढोले यांनी महामतांच्या विचारांवर प्रकाश टाकत आताच्या महिलांना प्रबोधन केले. सर्वसाधारण महिला व बाबासाहेब यांचे नाते त्यांनी सर्व महिलांना समजावून सांगितले. प्रमुख अतिथी म्हणून सफाळे उंबरपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच तनुजा कवळी उपस्थित होत्या. महिला मंडळ अध्यक्षा अर्चना जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले. तर उपाध्यक्षा स्वाती भोईर यांनी महामातांच्या जीवन कार्याचा समान धागा उलगडताना महिला दिनाचे महत्व आणि संविधान याबद्दल मनोगत व्यक्त केले.

सदर कार्यक्रमात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ यांच्या वतीने सफाळे विभागातील मांडे या गावातील वर्षा दयानंद जाधव व विराधन खुर्द या गावातील दिपाली दीपक गायकवाड या सामाजिक कार्यकर्त्यांचा विशेष महिला गौरव सन्मान म्हणून त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी समाजातील १०० हुन अधिक महिला कार्यक्रमाला उपस्थित होत्या.सदर कार्यक्रमाला लहान मुलांनी भाषणे सादर करून चांगले वातावरण निर्मिती केली. उपस्थित सर्व महिलांचे भिमाई महिला मंडळ यांच्यातर्फे सन्मान करण्यात आले. भिमाई महिला मंडळ व जयंती उत्सव मंडळ मधील उत्कृष्ट सामाजिक कार्य करणाऱ्या तसेच सामाजिक स्तरावर महिला सक्षमीकरण करणाऱ्या महिलांचा सन्मान उपस्थित अध्यक्ष प्रमुख वक्त्या व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला मंडळ सचिव शुभांगी शेष यांनी केले तर आभार खजिनदार शीला साळवी यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!