ताज्या घडामोडी

आमदार निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून संगणक व प्रिंटरचे वाटप

Spread the love

कोकण विभाग पदवीधर आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून मतदार संघातील शाळा व शासकीय कार्यालयांना संगणक व प्रिंटर वाटप सुरू आहे. ठाणे जिल्ह्यातील संगणक वाटपाच्या कार्यक्रमानंतर सध्या पालघर जिल्ह्यात वाटप सुरू आहे. पालघर वेतन पथक कार्यालयास तीन संगणक व दोन प्रिंटर या योजनेअंतर्गत मिळाल्यामुळे तांत्रिक अडचण दूर होऊन कामांना गती मिळणार आहे.
आमदार डावखरे हे सुरवातीपासूनच शाळा व शासकीय कार्यालये संगणकीकृत करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेले आहेत. बहुतांशी शासकीय कामकाज हे संगणकावर चालते. शासनाची अनेक कामे ऑनलाईन चालतात. पालघर वेतन पथक कार्यालय नुकतेच सुरू झाल्यामुळे येथे संगणक व प्रिंटर्सची नितांत गरज होती. ती आमदार डावखरे यांनी दूर केल्यामुळे अनुदानित शाळांतील कर्मचार्‍यांना त्याचा लाभ होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!