ताज्या घडामोडी

वन्य प्राण्यांकडून शेती नुकसान व हल्ले… शिराळा तहसीलवर मोर्चा,घेराव, व धरणे आंदोलन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

वाळवा व शिराळा तालुक्यात जंगल वन्यप्राण्यांकडून होणारे शेती व पशुधनाचे नुकसान व नागरिकांवरील हल्ले रोखण्यासाठी वन विभाग कोणत्याच उपाय योजना करत नाही म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामार्फत मोर्चा, धरणे आंदोलन व तहसील कार्यालयाला घेराव घालण्यात आला. सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, माजी जि. प. सदस्य रणधीर नाईक व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी. के. नायकवडी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. सकाळी 12 ते 2 वाजेपर्यंत मोर्चा च धरणे आंदोलन शांततेत होते. मात्र आपल्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही, अशी भावना आंदोलनकर्त्यांची झाली. संताप अनावर झाल्याने सर्वांनी तहसील कार्यालयात घुसून घेराव घातला. वन्यजीव विभागाचे वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय धेराव मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतल्यावर उपसंचालक स्नेहलता पाटील यांना कऱ्हाडहून शिराळ्याला यावे लागले. तोपर्यंत सर्वजण तहसील कार्यालयात फरशीवर बसून होते. उपसंचालक पाटील यांनी सात दिवसात चांदोली अभयारण्यास कुंपण घालण्याबाबत सर्वेक्षण सुरू करू व अन्य मागण्याबाबात ठोस आश्वासन दिल्यानंतर रात्री साडेनऊ वाजता झाला. या चर्चेत माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, सहाय्यक वन संरक्षक डॉ. अजित साजने, तहसीलदार शामला खोत-पाटील, ढेबेवाडीचे वन क्षेत्रपाल ज्ञानेश्वर राक्षे, पोलिस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम यांचा सहभाग होता. जिल्हाध्यक्ष नाईक, माजी जि. प. सदस्य नाईक, प्रकाश पाटील, के. वाय. भाष्टे, शिवाजी पाटील, माजी सरपंच आनंदराव पाटील, मणदूरचे माजी सरपंच वसंत पाटील आदींची धरणे आंदोलनस्थळी भाषणे झाली. विश्वासचे संचालक विश्वास कदम, विजयराव नलवडे, महादेव कदम, संभाजी पाटील, बाळासाहेब पाटील व संदीप तडाखे, रघुनाथ पाटील, डॉ. तानाजी पाटील, कोंडिबा चौगुले, सावळा पाटील आदी मान्यवर व शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!