ताज्या घडामोडी

पी जी शिंदे यांचा अमृत महोत्सवी सोहळा विविध कार्यक्रमांनी संपन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

येथील निळकंठेश्वर शिक्षण संस्था शिराळाचे संस्थापक पी.जी.शिंदे सर यांचा अमृतमहोत्सवी सोहळा शिराळा येथे विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. यावेळी सांगली जि.म. सह बँकेचे संचालक सत्यजित देशमुख यांच्या हस्ते पी जी शिंदे सत्कार करणेत आला.यावेळी बोलताना सत्यजित देशमुख म्हणाले की पी जी शिंदे सर यांनी संस्थेची स्थापना करुन सुरुवातीला बालवाड्या सुरू केल्या.नंतर डिग्रज येथे आश्रम शाळा सुरू केली.अत्यंत चांगल्या पद्धतीने शाळेचे कामकाज सुरू आहे.
स्व. शिवाजीराव देशमुख यांचे विश्वासू व निष्ठावान कार्यकर्ते होते. स्व. शिवाजीराव देशमुख यांनी सोपवलेली जबाबदारी अत्यंत प्रामाणिक पणे पार पाडत होते.या वेळी स्व. शिवाजीराव देशमुख साहेब व पी.जी. शिंदे यांच्या स्नेहाला उजाळा देणेत आला.
७५ दिव्यांनी पी जी शिंदे यांचे औक्षण करून केक कापणेत आला. तसेच पी.जी. शिंदे यांची ग्रंथतुला करणेत आली. ग्रंथतुलेसाठी यांची वापरले शेकडो पुस्तके प्राथमिक आश्रमशाळा कसबे डिग्रजच्या ग्रंथालयाला भेट देणेत आली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आनंदराव दळवी -पाटील यांनी केले. यावेळी . अरुण पवार, पांडुरंग सूर्यवंशी, सत्यजित जाधव, संजय गुरव यांनी मनोगत व्यक्त केले.आमदार मानसिंगराव नाईक यांनी पी जी शिंदे यांचा सत्कार केला तर माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी शुभसंदेश दिला .
या वेळी अरविंद शिंदे यांनी आभार मानले सूत्रसंचालन विनायक गायकवाड यांनी केले.या कार्यक्रमाला जिल्हयातील विविध आश्रमशाळांचे संस्थापक,तसेच, . आनंदराव नलवडे,रणजितसिंह नाईक,प्रतापराव यादव,अशोक पाटील, के.डी.पाटील, सम्राट शिंदे, वैभव रकटे, विजय शिंदे, तसेच शिराळा परीसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!