ताज्या घडामोडी

लक्ष्मण माच्छी यांना राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी तारीख २
मालपाणी हेल्थ क्लब सेंटर , संगमनेर येथे संजीवनी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणीजनांचा राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळा नुकताच संपन्न झाला.

या सोहळ्यामध्ये पालघर मधील डहाणू तालुक्यातील शांती आदिवासी विद्यामंदिर, मोडगाव शाळेतील शिक्षक लक्ष्मण संभू माच्छी यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन या वर्षीचा राज्यस्तरीय शिवछत्रपती महाराष्ट्र गौरव पुरस्कार २०२४ विधान परिषद सदस्य महाराष्ट्र राज्य आ.सत्यजित तांबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. शिवछत्रपती महाराज यांची प्रतिमा व चषक , सन्मानपत्र व शाल असे सत्काराचे स्वरूप होते. त्यांच्यासोबत मोहनिश माच्छी,राहुल माच्छी आणि रुपेश माच्छी होते. यावेळी प्रमुख अतिथी भाऊसाहेब वाकचौरे, विवेकभैय्या कोल्हे, खा.सदाशिव लोखंडे उपस्थित होते.

प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले.आजच्या भावी विद्यार्थ्यावर भारताचे भवितव्य अवलंबून आहे.चांगले संस्कार विद्यार्थ्यावर करणे ही पालकांची तसेच शिक्षकांची जबाबदारी आहे अशा मोलाचा संदेश दिला.संजीवनी फाऊंडेशन चे चेअरमन डॉ. ज्ञानेश्वर वसंतराव सानप यांनी उपस्थितांचे आभार मानले. माच्छी यांचे सोशल मीडियावर अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!