ताज्या घडामोडी

घरडा कंपनीने दिव्यांगासाठी राबवला विशेष सामाजिक उपक्रम

Spread the love

दापोली तालुक्यात २५७ दिव्यांगाना केले मोफत अत्यावश्यक साहित्याचे वाटप

दापोली — लोटे औद्योगिक क्षेत्रातील नामांकित अशी घरडा केमिकल्स लिमिटेड नेहमीच आपल्या विविध सामाजिक उपक्रमामध्ये अग्रेसर असते, नुकतेच कंपनीच्या सामाजिक उपक्रमांतर्गत (सी. एस. आर. ) दापोली तालुक्यातील २५७ दिव्यांगाना विविध साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

त्यासाठी कंपनीमार्फत अलीमको या संस्थेच्या मदतीने डिसेंबर २०२३ मध्ये तालुक्यातील सर्व दिव्यांगासाठी तपासणी शिबिराचे आयोजन दापोली सिव्हिल हॉस्पिटल येथे करण्यात आले होते, शिबिरामधून २५७ दिव्यांग बंधुभगिनींना निवडून त्यांच्यासाठी नुकतेच मोफत साहित्य वाटप शिबीर आयोजित केले गेले त्यामध्ये २५७ दिव्यांग बंधुभगिनींना कुबड्या, तीन चाकी सायकल्स, इलेक्ट्रिक तीन चाकी सायकल्स, मूकबधिर मुलांसाठी मशिन्स, कृत्रिम हात आणि पाय यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला घरडा कंपनीचे एच. आर. जनरल मॅनेजर श्री. अनिल भोसले, कंपनीचे सी. एस. आर. मॅनेजर श्री. बापूराव पवार, दापोली तालुका गट विकास अधिकारी श्री. सुनील खरात, तालुका आरोग्यअधिकारी डॉ .मारकड ,अलीमकोचे श्री. कमलेश यादव तसेच दापोली अपंग विकास संस्थेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. घरडा कंपनीमार्फत २५ लाख रुपये किंमतीचे साहित्य वाटप करण्यात आले आहे. घरडा कंपनीच्या या सामाजिक उपक्रमाचे गट विकास अधिकारी श्री. खरात तसेच दिव्यांग लाभार्थी बंधु भगिनींनी कौतुक करत दिलेल्या मदतीबद्दल कंपनी प्रशासनाचे आभार मानले. घरडा कंपनी मार्फत श्री. अनिल भोसले आणि श्री बापूराव पवार यांनी सर्व दिव्यांग बंधुभगिनींना सदर साहित्याचे वाटप करून शुभेच्छा दिल्या. साहित्य वाटप कार्यक्रमासाठी घरडा कंपनीला पंचायत समिती दापोली, समाजकल्याण विभाग रत्नागिरी आणि अलीमको मुंबई यांचे विशेष सहकार्य लाभले.घरडा कंपनीच्या या विशेष सामाजिक उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!