ताज्या घडामोडी

जनजागृती सेवा संस्थेचा (रजि.) तृतीय वर्धापनदिन आणि “राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन

Spread the love

जनजागृती सेवा संस्था (रजि.) या सामाजिक संस्थेचा तृतीय वर्धापनदिनाच्या निमित्ताने संस्थांना “राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार व समाजरत्न पुरस्कार २०२४ प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. १० मार्च २०२४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. प्रमुख पाहुणे म्हणून पद्मश्री गजानन माने, राजेंद्र पंढरीनाथ घोरपडे (मा. नगराध्यक्ष, गटनेते), सुनिल भाऊ झळके ( सहाय्यक आयुक्त शिक्षण भिवंडी निजापूर शहर महानगरपालिका भिवंडी) , प्रदीप पंढरीनाथ जोशी (अध्यक्ष-महाराष्ट्र अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघ ) ,विक्रांत बापट (चिफ ऑपरेटिंग ऑफीसर (सी.ओ.ओ.) महागणपती हॉस्पिटल, टिटवाळा) सौ. हर्षदा प्रभू (निर्मिती सहाय्यक आणि मुलाखतकार मुंबई आकाशवाणी केंद्र ) खलील शिरगावकर (उद्योजक व समाजसेवक) महेश्वर भिकाजी तेटांबे (अभिनेता, लेखक-दिग्दर्शक, वृत्तपत्र लेखक, पत्रकार) प्रकाश पाटकर (अध्यक्ष महाराष्ट्र मराठी मुक्त पत्रकार संघ),सौ. गीता कुडाळकर (अभिनेत्री, समाजसेविका ),सुनिल शिर्के ( अध्यक्ष – शिर्के जनकल्याण प्रतिष्ठान, मुंबई) आदी उपस्थित राहणार आहे- कार्यक्रमाची रुपरेषा-दीपप्रज्वलन , शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण , प्रमुख पाहुण्यांचे स्वागत सचिव सौ. संचिता भंडारी यांची प्रस्तावना ,संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांचे मनोगत प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट संस्था पुरस्कार वितरण सोहळा असे असणार आहे. समारंभाचे ठिकाण –अजय राजा हॉल, बदलापुर एम. टी. स्टेंड समोर, बदलापूर (पश्चिम) आहे.आयोजक जनजागृती सेवा संस्था (रजि.)- सर्व पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य, सल्लागार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!