ताज्या घडामोडी

न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेत मराठी राजभाषा दिन संपन्न

Spread the love

शैक्षणिक व सामाजिक संस्था,सैतवडेच्या न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेत 27 फेब्रुवारी 2024ला मराठी राजभाषा दिनाचे आयोजन करण्यातआले होते. प्रशालेचे मराठी विषय शिक्षक श्री.संतोष चव्हाण सर यांनी उपस्थितांना मराठी राजभाषा दिनाची पार्श्वभूमी समजावून देताना रसभरित शब्दांत मांडलेल्या कुसुमाग्रजांच्या जीवनपटाने सर्व भारावून गेले.नंतर श्री चव्हाण सरांनी स्वरचित कविता सादर करून विद्यार्थ्यांमध्ये काव्य रचनेच्या प्रेरणा जागृत केल्या.यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.अंगद मुठाळ सर श्रीम.सिद्धी लांजेकर मॅडम,सौ.नसिम शेकासन मॅडम व संज्योत खेडेकर मॅडम उपस्थित होते.श्री.नितीन जाधव यांनी बोली भाषांचे महत्त्व विशद करून मराठी साहित्यात कथा कादंबऱ्यांसारख्या विविध साहित्य कृतींची भर टाकलेल्या अनेक लेखक – कवी यांच्या अनेक साहित्य कृतींचे वाचन करून पहिल्यांदा उत्कृष्ट वाचक होऊया असे सूचित केले. 27फेब्रुवारी 2024पासून एक वर्षाने आपण केलेल्या प्रवासाची प्रवास वर्णने, कविता,चारोळ्या,कथा, दैनंदिनी (रोजनिशी)व विविध विषयांवरील संवाद तसेच पथनाट्यासाठी लेखन यांसारखे विविध विषयांवर उत्स्फूर्तपणे केलेल्या लेखन साहित्याचे मराठी राज्य भाषा दिनी सादरीकरण करण्यात येईल,असे विद्यार्थी वर्गाला स्वयं लेखनासाठी प्रेरित करण्यात आले.विद्यार्थ्यांनी दिवसभर मराठी राजभाषेचा महिमा जागवताना मराठी कविता व देश भक्तीपर गीते गायली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!