ताज्या घडामोडी

विज्ञानाशिवाय समाजाचा विकास नाही….. डॉ. सिद्राम ख्याडे

Spread the love

मुरूम, ता. उमरगा, ता. २८ (प्रतिनिधी)

दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानात विज्ञानाचे महत्त्व सांगण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे आकर्षित करणे, प्रेरित करणे, जनजागृती करणे, गैरसमज आणि अंधश्रद्धा नष्ट करणे, नवनवीन शोध लावणे आणि देशाच्या विकासासाठी वैज्ञानिक विचाराचा प्रचार-प्रसार करणे या हेतूनेच हा दिवस साजरा केला जातो. विज्ञानाशिवाय समाजाचा विकास नाही असे प्रतिपादन उमरगाचे रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष तथा स्त्रीरोग तज्ञ डॉ. सिद्राम ख्याडे यांनी केले. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित परिसंवाद कार्यक्रमात रसायनशास्त्र पदवी-पदव्युत्तर व संशोधन केंद्र आणि माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. २८) रोजी भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमन यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी औसा येथील कुमार स्वामी महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागाचे प्रो. डॉ. प्रसाद कदम, फार्मसी कॉलेजचे समन्वयक प्रा. डॉ. रवींद्र आळंगे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. सुजित मठकरी, डॉ. सुशील मठपती, उपप्राचार्य योगेश पाटील, प्रा. प्रियंका काजळे, प्रा. राजनंदिनी लिमये, प्रा. डॉ. अप्पासाहेब सुर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. सी.व्ही. रमण यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. पुढे बोलताना डॉ. ख्याडे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी विज्ञानानिष्ठ दृष्टिकोन जोपासून समाजात जगले पाहिजेत. चौकट : यावेळी डॉ. कदम यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाचे महत्त्व, पार्श्वभूमी व त्याची भूमिका स्पष्ट करताना मनुष्याच्या जन्मापासूनच विज्ञान सुरु होते. ते आयुष्यभर चालू राहते. आजच्या तरुणांपुढे विज्ञानवाद हे मोठे आव्हान आहे. हे आव्हान आजच्या तरुणांनी संशोधनाच्या माध्यमातून पेलले पाहिजेत. याप्रसंगी विज्ञान प्रदर्शनामधून एम. एस्सी. भाग-२ (रसायनशास्त्र) दिवा पेटविणे, गुरुनाथ हेंडले (प्रथम), जादू पोटॅशियम, शंभूराजे काजळे (द्वितीय), गॅस वेल्डिंग गॅस फायर, अभिजीत जामगे (तृतीय) तर फार्मसी कॉलेजमधून औषधी गोळ्या बनविणे, मयूर गायकवाड (प्रथम), मेडिकल स्टोअर्स, सुमित मंडल, संग्राम आसबे, माधव बिराजदार, जुबेर पठाण, गणेश बिराजदार (द्वितीय), हृदय रक्तवाहिनी प्रणाली, नबिलाल जमादार, परमेश्वर निरगुडे (तृतीय) क्रमांक मिळविल्याबद्दल व सहभागी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, ग्रंथ व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. प्रा. सचिन राजमाने, प्रा. लक्ष्मण पवार, प्रा. अजिंक्य राठोड, प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, प्रा. सुदिप ढंगे, प्रा. अमोल मोरे, प्रा. विवेकानंद चौधरी, प्रा. सदफअलमास मुजावर, प्रा. नितीन हुलसुरे, अमोल कटके, किशोर कारभारी आदींनी पुढाकार घेतला. यावेळी डॉ. सुजित मठकरी यांच्या फिजिकल केमिस्ट्री : थ्रु सॉल्व्हड प्रोब्लेमस व डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी यांच्या अप्लाइड केमिस्ट्री या ग्रंथाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सुशील मठपती यांनी व्हिडिओद्वारे विकसित भारत अभियान आत्मनिर्भय बने हम I बोलो वंदे मातरम् या गीतातून मांडले. सूत्रसंचलन प्रा. अशोक बावगे तर आभार डॉ. सुजित मठकरी यांनी मानले. यावेळी विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. सिद्राम ख्याडे, डॉ. प्रसाद कदम, प्राचार्य अशोक सपाटे, रविंद्र आळंगे, अशोक बावगे, सुशील मठपती व अन्य.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!