आरोग्य व शिक्षण

लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय फणसोप येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

Spread the love

पावस : पंचायत समिती रत्नागिरी शिक्षण विभाग व रत्नागिरी तालुका विज्ञान मंडळ तसेच श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय कसोप फणसोप
यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्षाचे तालुकास्तरीय ५० वे विज्ञान प्रदर्शन फणसोप येथील डॉ.विक्रम साराभाई विज्ञान नगरी येथे घेण्यात आले आहे . या प्रदर्शनाचे उद्घाटन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कीर्ती कीर्ती किरण किरण पूजार यांच्या हस्ते व प्रमुख अतिथी परीक्षित यादव, गट विकास अधिकारी जे. पी.जाधव, गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे, जीवन विद्या मंडळाचे अध्यक्ष कमलाकर साळवी, शाळा समिती अध्यक्ष प्रकाश साळवी , तालुका विज्ञान मंडळाचे अध्यक्ष राजन रहाटे व मुख्याध्यापक सौ नेत्रा राजेशिरके यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.हे प्रदर्शन बुधवार दि.११ /१/२०२३ पर्यंत सुरू राहणार आहे.१० तारखेला मंगळवारी
सकाळी नऊ ते दहादरम्यान विज्ञान दिंडी काढण्यात आली.
दुपारी बारा ते सायंकाळी पाचदरम्यान प्रश्नमंजूषा कार्यक्रम झाला. या प्रश्नमंजुषा कार्यक्रमांमध्ये इयत्ता सहावी ते इयत्ता बारावीपर्यंत शिकत असणाऱ्या ६६ विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.
. बुधवारी सकाळी साडेदहा ते दुपारी दोनदरम्यान विविध व्याख्यानाचे आयोजन केले असून , दुपारी तीन ते सायंकाळी साडेपाच च्या दरम्यान मान्यवरांच्या हस्तेबक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न होणार आहे . मंगळवारी व बुधवारी सकाळी दहा ते सायंकाळी पाचदरम्यान प्रदर्शन पाहण्यासाठी खुले असेल . प्रदर्शनात सहावी ते बारावीतील विद्यार्थ्यांच्या विज्ञान प्रतिकृती , शिक्षकांचे प्रकल्प अधिक मॉडेल ११५ हुन अधिक विज्ञान प्रतिकृती मांडण्यात आल्या आहेत. या प्रदर्शनामध्ये तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांतील विद्यार्थी व शिक्षक, विज्ञान परिचर यानी उस्फूर्तपणे सहभाग दर्शविला. यावेळी विज्ञान प्रदर्शनामध्ये विस्ताराधिकारी सुनील पाटील, डॉ.दत्तात्रय सोपनुर सशाली मोहिते सौ. भाग्यश्री हिरवे,सौ.सविता तोटावार, श्री संजय पवार व विषय तज्ञ विज्ञानाचे चाहते शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!