आरोग्य व शिक्षण

सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाच्या शालेय स्पर्धा संपन्न

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी
सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळ आयोजित शालेय क्रीडा स्पर्धा व खुला गट व्हॉलीबॉल स्पर्धा चहाडे येथील स्वर्गीय तारामती हरिश्चंद्र पाटील विद्यालयाच्या पटांगणावर रविवारी पार पडल्या.

शालेय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे माजी चिटणीस अनिल पाटील यांच्या हस्ते झाले. तर मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे उद्घाटन लालठाणे येथील उद्योजक प्रफुल्ल पावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे माजी उपाध्यक्ष तथा चहाडे येथील सामाजिक कार्यकर्ते अजय पाटील, वाडा येथील मॅजिक क्राफ्ट कंपनीचे सीनियर मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले लालठाणे येथील अजय पाटील, अबुधाबी येथे सीनियर मॅनेजर म्हणून कार्यरत असलेले कुडे येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र सातवी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष महेंद्र सोगले होते.

यावेळी शालेय गटातील मुला- मुलींच्या कबड्डी, खो-खो, १०० मीटर धावणे, मिनी मॅरेथॉन स्पर्धा तर खुल्या गटामध्ये व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात आल्या.

याप्रसंगी मंडळाचे माजी अध्यक्ष तथा विश्वस्त अशोक ठाकूर, माजी अध्यक्ष तथा विश्वस्त प्रमोद पाटील, पालघर पंचायत समितीचे माजी उपसभापती चेतन पाटील, विद्यमान विश्वस्त सुनील शेलार, भालचंद्र पाटील, चंद्रशेखर नाईक, उपाध्यक्ष विपुल पाटील, योगेश पाटील, ज्येष्ठ कबड्डीपटू प्रकाश पाटील, माजी अध्यक्ष हरेश्वर नाईक, विद्यालयाचे मुख्याध्यापक किरण पाटील, माजी उपाध्यक्ष संदेश सातवी, मनोज ठाकूर, मंडळाचे चिटणीस कल्पेश पवार, सहसचिव उत्तम पाटील, नितिन पावडे, खजिनदार हेमंत पावडे आणि आजी- माजी पदाधिकारी तसेच क्रीडा शिक्षक व खेळाडू उपस्थित होते.

शालेय मुलांच्या कबड्डी स्पर्धेमध्ये हालोली या संघाने उर्से या संघावर मात करून विजय मिळविला. तर मुलींच्या नावजे (अ) संघाने नावजे (ब ) या संघावर मात करून विजय पटकावला. खो खो स्पर्धेमध्ये मुलांच्या नावजे संघाने लोवरे संघाला पराजित करून विजेतेपद पटकावले तर चहाडे मुलींच्या संघाने निहे संघावर विजय मिळवला. तर यावेळी झालेल्या व्हॉलीबॉल खुल्या गटातील स्पर्धेमध्ये चहाडे (अ) संघाने चहाडे ( ब ) संघावर मात करून विजेतेपद पटकावले.

-मिनी मॅरेथॉन स्पर्धा विजेते-

खुला गट (मुले)-
प्रथम क्रमांक: कु. प्रणित संतोष पाटील, आंबेदे
खुला गट (मुली)-
प्रथम क्रमांक: कु दिशा विश्वास पाटील, काटाळे

शालेय गट -८ वी ते १० वी (मुले)
प्रथम: कु. प्रियांशू सचिन पाटील, लालठाणे
द्वितीय: कु. सार्थक नितीन पाटील, तांदुळवाडी
तृतीय: कु.सोहम राकेश पाटील, लालठाणे

८ वी ते १० वी (मुली)
प्रथम: कुमारी मनस्वी पंढरी पाटील,कोकणेर
द्वितीय:कुमारी हार्दिका विनोद घरत, वसरे
तृतीय: कुमारी आर्या संतोष घरत, वसरे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!