ताज्या घडामोडी

लोकशाही पत्रकार संघाच्या लेडी सिंघम पूजा काळे, प्राजक्ता रसाळ, शिवानी जगताप यांची नियुक्ती जाहीर

लोकशाही पत्रकार संघाच्या उद्योग विकास समिती जालना जिल्हा अध्यक्ष म्हणून लेडी सिंघम पूजा काळे यांचे नियुक्ती तर बीड तालुका अभियंता विकास समितीच्या पदी प्राजक्ता रसाळ यांची नियुक्ती तर बँकिंग विकास समितीच्या बीड शहर अध्यक्षपदी
शिवानी जगताप यांची नियुक्ती जाहीर .

बीड प्रतिनिधी.

सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात अग्रेसर असलेला महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघ या पत्रकार संघामध्ये विविध 72 विकास समिती आहेत या समितीच्या प्रत्येक वेगवेगळ्या समितीवर नियुक्त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये सध्या जाहीर होत आहेत याच अनुषंगाने जालना जिल्ह्याच्या उद्योग विकास समितीच्या जिल्हाध्यक्षपदी उत्कृष्ट व्यावसायिक मध विक्रेत्या लेडी सिंघम म्हणून ज्यांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे व लोकशाही पत्रकार संघांचे राष्ट्रीय अध्यक्ष भागवत वैद्य,राष्ट्रीय अध्यक्षा महिला आघाडी हालिमा शेख,राज्य मार्गदर्शक विजेंद्रजी डूलगच, राष्ट्रीय उपाध्यक्ष संदीप जाधव,राष्टीय उपाध्यक्ष महिला आघाडी निलोफर शेख,प्रदेश अध्यक्ष प्रताप साळुंखे पाटील, प्रदेश युवा अध्यक्ष किशोर पवार,प्रदेश सचिव गणेश जगदाळे, प्रदेश कार्याध्यक्ष अयुब खान पठाण, प्रदेश अध्यक्ष डिजिटल मीडिया रमेश जोगदंड, प्रदेश उपाध्यक्ष डिजिटल मीडिया महेबूब शेख,प्रदेश उपाध्यक्ष अनिस कुरेशी, आजाद शेख,मराठवाडा कायदेशीर सल्लागार अँड श्रीकांत जाधव, बीड जिल्हा अध्यक्ष सायं दैनिक बीड सरकार चे संपादक साहस अदोडे,डॉ. दीपक तांगडे, लेक लडकी अभियान चे बाजीराव ढाकणे, डॉ. गजानन वटाणे, यांच्या आदेशानुसार बीड जिल्हा संघटक संजय कुलकर्णी, पत्रकार किशोर कुलकर्णी,शिवाजी नवले यांनी लेडी सिंघम पूजा काळे यांची लोकशाही पत्रकार संघाच्या उद्योग विकास समितीच्या जालना जिल्हाध्यक्षपदी आज बीड येथे शासकीय विश्रामगृह येथे नियुक्ती जाहीर करून त्यांना नियुक्तीपत्र व आयडी कार्ड लोकशाही पत्रकार पत्रकार संघाचे सर्वे सर्वा मा श्री संस्थापक अध्यक्ष बीबी वैद्य साहेब यांनी सर्वांच्या उपस्थितीत दिले तसेच इंजिनिअरिंग विकास अभियंता समितीच्या बीड तालुका अध्यक्ष म्हणून प्राजक्ता रसाळ मॅडम यांची नियुक्ती जाहीर करून त्यांना ही नियुक्ती प्रमाणपत्र व आयडी कार्ड देण्यात आले तसेच एसबीआय बँकिंग क्षेत्रामध्ये उत्कृष्ट उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्व नागरिकांना बँकिंग क्षेत्राच्या कार्यामधून न्याय मिळवून देणाऱ्या शिवानी जगताप मॅडम यांची बीड शहर अध्यक्ष म्हणून बँक विकास समितीवर त्यांना नियुक्ती देऊन तसे नियुक्त पत्र त्यांना राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा श्री नवनाथ जी अण्णा शिरोळे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी दिले होते परंतु आयडी कार्ड त्यांना आज संस्थापक अध्यक्ष बीबी वैद्य यांच्या हस्ते देण्यात आले. या वेळी येथे उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघाचे सर्वे सर्वा मा श्री संस्थापक अध्यक्ष बीबी वैद्य साहेब तसेच बीड जिल्हा अध्यक्ष तथा दैनिक सरकारचे मुख्य संपादक मा श्री सहास जी आदोडो साहेब तसेच बीड नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक तथा बीड जिल्हा सत्र न्यायालयातील सुप्रसिद्ध एडवोकेट तथा लोकशाही पत्रकार संघाचे कायदेशीर सल्लागार एडवोकेट गोविंद शिराळे पाटील तसेच महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघाचे राजकीय विकास समितीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मा श्री यशवंतराव कदम साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष आत्माराम जी वाव्हळ सर व प्राध्यापक शशिकांत रसाळ सर तसेच विठ्ठलराव जगताप सर तसेच महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघाचे बीड जिल्हा संघटक संजय देवा कुलकर्णी कुक्कडगावकर पिंपळनेर सर्कलच्या लोकशाही पत्रकार संघाच्या अध्यक्षा मनीषा देवडकर मॅडम व गेवराई तालुक्याच्या आरोग्य विकास समितीच्या अध्यक्षा गायत्री गलधर मॅडम तसेच महाराष्ट्र राज्य लोकशाही पत्रकार संघाच्या नारायण गड सर्कलच्या सर्कल प्रमुख इंजिनिअरिंग विकास अभियंता विकास समितीच्या लोकशाही पत्रकार संघाच्या भाग्यश्री मॅडम तसेच पूजा काळे मॅडम यांच्या भगिनी ताई तसेच त्यांचे भाऊ सह सर्व उपस्थित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पूजा काळे,प्राजक्ता रसाळ, शिवानी जगताप यांच्या निवडी संपन्न झाल्यानंतर त्यांना नियुक्ती प्रमाणपत्र देऊन त्यांना आयडी कार्ड घेऊन त्यांच्या उत्कृष्ट पुढील कार्यासाठी सर्वांच्या वतीने मनस्वी शुभेच्छा देण्यात आल्या व सर्वांकडून उत्कृष्ट लोकशाही पत्रकार संघाचे कार्य भविष्यात आपण कराल असी अपेक्षा ही यावेळी उपस्थित मान्यवर यांनी व्यक्त केल्या .त्यांच्यावर राज्यातून शुभेच्छा चा वर्षाव होतं आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??