ताज्या घडामोडी

शेवगाव तालुक्यातील शेवगाव तालुक्यातील जळगाव येथे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान व वृद्धेश्वर फार्मर प्रोडूसर कंपनी यांच्यामार्फत भव्य शेतकरी मेळावा उत्साहात पार

Spread the love

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिक्षण क्षेत्रात क्रांती करणारे व त्रिमूर्ती चे अध्यक्ष साहेबराव घाडगे पाटील होते याप्रसंगी प्रमुख उपस्थितीमध्ये बापूसाहेब पाटेकर अण्णासाहेब पाटेकर अनंता उकिरडे महादेव पाटेकर सूर्यभान गाडगे बाळासाहेब कराड व सरपंच गणेश कराड उपसभापती देवदास पाटेकर माजी सरपंच आदिनाथ कराड कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे भूमि रत्न डॉक्टर विलास बगाटे व्यासपीठावर उपस्थित होते
याप्रसंगी जेष्ठ नेते व भाजपा किसान कार्यकारिणीचे प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब पाटेकर यांनी शेतकरी संरक्षण कायदा आला पाहिजे यासाठी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने विचार मंथन घडवून हा प्रश्न ऐरणीवर आणावा अशी आवाहन केले
कृषी शास्त्रज्ञ डॉ अशोकराव ढगे यांनी कृषी उत्पादन वाढीसाठी पंचशील तत्त्वावर सविस्तर मार्गदर्शन केले भूमी रत्न डॉक्टर विलास बगाटे यांनी शेतीसाठी पाणी तपासणी यासंदर्भात वॉटर कंडिशनर मशीनचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे महत्त्व विशद केले ढोर जळगाव परिसरामध्ये अनेक विहिरी व बोरचे पाणी क्षारयुक्त झाले आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी वॉटर कंडिशनर मशीनचा वापर करावा व जमिनीचे आरोग्य सांभाळावे आणि भरघोस उत्पादन घ्यावे यासंदर्भात मार्गदर्शन केले कार्यक्रमाला कृषी अभ्यासक कुमारी प्रिया मते व प्रगतशील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर किशोरराव घनवटे यांनी सूत्रसंचालन केले तसेच फार्मर प्रोडूसर कंपनीने या पुढील काळात निर्यातीचे परवाने घेऊन शेतमाल निर्यात करावा व शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. सर्वांचे ऋणनिर्देश व आभार प्राध्यापक मनोज घाडगे यांनी केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!