ताज्या घडामोडी

श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात विविध उपक्रमा‌द्वारे मतदार जन-जागृती

Spread the love

नेवासा -नेवासा येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या श्री ज्ञानेश्वर महावि‌द्यालयात मतदार जन-जागृतीसाठी जागर लोकशाहीचा ” या उपक्रमांतर्गत विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांना विद्यालय प्रांगनात मतदार जनजागृतीची शपत देऊन करण्यात आला.

त्याचप्रमाणे चित्रकला स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा आणि मतदार जनजागृतीवर गीत सादरीकरण, निबंध स्पर्धा आणि मतदानाचे महत्व वाढविणारे विषय देऊन गेले आठवडाभर विविध उपक्रम राबविण्यात आले सदर उपक्रमात विद्यार्थ्यांनी उस्त्फुर्त सहभाग नोंदविला. या उपक्रमात प्रा. सूर्यकांत बर्डे आणि प्रा रविंद्र घोलप यांनी नोडल अधिकारी म्हणून काम पहिले कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. दशरथ आयनर आणि महावि‌द्यालयाचे प्राचार्य डॉ गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी वि‌द्यार्थ्यांना लोकशाहीत मतदान मोलाचे या विषयावर मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका प्रा. राधा मोटे यांनी विविध उपक्रमाचे नियोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!