ताज्या घडामोडी

उन्हाळी सेंद्रिय बाजरीचे जोमदार बहरलेले शेत

Spread the love

नेवासा तालुक्यातील भेंडे येथील युवक शेतकरी वैभव अशोक जगताप यांनी आपल्या शेतात उन्हाळी सेंद्रिय बाजरीचे जोमदार पीक घेतले आहे खरीप हंगामातील तुरीची काढणी झाल्यानंतर नांगरट केली व हेरो चालवून जमीन भुसभुशीत केली त्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बायो ३६६ या वाणाची पेरणी केली साधारणपणे 25 दिवसांनी एक खुरपणी केली उन्हाळी हंगाम असल्यामुळे मध्यम भारी जमिनीला दर दहा ते अकरा दिवसांनी पाणी दिले तुरीचे बेवड व उत्तम शेणखत दिल्यामुळे रासायनिक खतांचा वापर केला नाही या पिकाची पाहणी कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केली जगताप यांनी अतिशय देखणा भरघोस उत्पादन देणारा बाजरीचा उन्हाळी हंगामातील सेंद्रिय प्लॉट उभा केल्याबद्दल शेतकऱ्यांचे कौतुक केले जगताप म्हणाले की एकरी बाजरीचे उत्पादन 18 ते 20 क्विंटल सहज मिळेल असा त्यांना आत्मविश्वास आहे इतर शेतकऱ्यांनीही या या उन्हाळी सेंद्रिय बाजरीच्या प्लॉटला अवश्य भेट द्यावी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!