ताज्या घडामोडी

जव्हार अर्बन बँकेची वाटचाल समृध्दीकडे, बँकेचे चेअरमन निलेश पाटील यांचे प्रतिपादन

Spread the love

पालघर जिल्हा प्रतिनिधी ता. २
ठाणे व पालघर जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या ग्रामीण भागातील जनतेची अर्थवाहीनी समजल्या जाणा-या दि जव्हार अर्बन को-ऑप. बँकेने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात उल्लेखनीय प्रगती केली आहे. बँकेने दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी आर्थिक हिशोब पत्रके पूर्ण करून दिलेल्या आकडेवारीनुसार बँकेच्या ठेवी, कर्जामध्ये वाढ झाली आहे. गतवर्षी बँकेचा तरतुद पूर्व नफा रू. १०१.२४ लक्ष होता यावर्षी तो रू. २१५.४५ लक्ष झाल्याने बँकेची नफा क्षमता वाढली आहे.

बँकेचे विद्यमान चेअरमन निलेश ज. पाटील व व्हा. चेअरमन वैभव श्री. अभ्यंकर यांनी बँकेचे मार्गदर्शक व जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या मार्गदर्शनामुळे बँकेची वाटचाल समृध्दीकडे होत आहे. त्यांच्या अधिपत्याखाली बँकेच्या निवडणूकीच्या दरम्यान त्यांनी बँकेच्या सभासद, ग्राहक व हितचिंतक यांना दिलेल्या शब्दाची पूर्ती करताना आम्हा सर्वांस आनंद होत आहे असे मनोगत व्यक्त केले.

विद्यमान संचालक मंडळाने नोव्हेंबर २०२२ रोजी कार्यभार हाती घेतला त्यावेळी ऑक्टोबर २०२२ अखेर ग्रॉस एन. पी. ए. ३२.२८% व नेट एन.पी. ए. २४.७७% इतक्या प्रचंड प्रमाणात वाढला होता. दिनांक ३१ मार्च २०२४ अखेर बँकेचा ग्रॉस एन. पी. ए. ८.६८% असुन नेट एन. पी. ए. ० % झाला आहे. सन २०१४ पासुन गेली १४ वर्षे बँकेचा एन. पी. ए. सतत वाढत होता, तो मोठ्या प्रमाणात अल्पवधीत कमी करण्यात बँकेचे विदयमान संचालक मंडळ व प्रशासन यशस्वी झाले आहे. बँकेने साधारणतः २० वषपिक्षा जास्त कालावधीच्या जुन्या थकीत कर्जाची वसुली केली आहे. बँकेस कर्ज वसुलीसाठी बँकेच्या हिताकरीता काही कठोर निर्णय घ्यावे लागले. परंतू कर्ज वसुलीकामी कर्जदार सभासदांनी देखील बँकेस सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे देखील बँकेच्या संचालक मंडळाने आभार मानले. तसेच काही कर्जदारांना रकमा भरणे शक्य झाले नाही. ते सुध्दा बँकेस निश्चित सहकार्य करतील अशी अपेक्षा व्यक्त करून बँकेच्या सर्व शाखा नफ्यामध्ये असल्याने समाधान व्यक्त केले. बँकेचे सर्व संचालक एकत्रितपणे बँकेच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

बँकेचे माजी चेअरमन हबीब शेख व माजी व्हा. चेअरमन प्रविण मुकणे यांनी संचालक मंडळाच्या सहकार्याने बँकेस दिलेली प्रगतीची दिशा यापूढे देखील सर्वाच्या सहकार्याने सुरू राहील. असे मनोगत व्यक्त केले.

बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मुकणे, यांनी बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेवून सर्वानी नियोजनबध्द कामकाज केले त्याबद्दल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!