ताज्या घडामोडी

पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळ अमळनेर तर्फे डॉ मनीष चौधरी जळगाव यांचे “चला गुडघेदुखीवर बोलू काही” या विषयावर व्याख्यान संपन्न

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

पूज्य साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या दिनांक 31 मार्च रोजी झालेल्या मीटिंगमध्ये प्रमुख पाहुणे प्रमुख वक्ते म्हणून जळगाव येथील आर्थो , डी एन बी ,डॉ मनीष चौधरी यांना आमंत्रित केलं होतं सदर मीटिंगमध्ये प्रथम पूज्य साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येऊन दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे व सर्व कार्यकारी मंडळाने केले त्यानंतर खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, ही प्रार्थना सामुदायिक म्हणण्यात आली नंतर दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .

नेहमी प्रमाणे प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केला . त्याचप्रमाणे मार्च महिन्यात ज्यांचे वाढदिवस होते त्या ज्येष्ठांना श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. या ठिकाणी मंडळाचे सदस्य श्री जाधव सर यांनी पूज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाच्या इमारत उभारणी कामी संपूर्ण कार्यकारी मंडळाने चांगलं कार्य करून, इमारत उभी करून तिचा ताबा घेतला या कार्यावर प्रभावित होऊन सर्व कार्यकारी मंडळाचा त्यांनी वैयक्तिक श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. प्रमुख वक्ते डॉ मनीष चौधरी डी एन बी यांनी सिनेट स्लाईट दाखवत सर्व गुडघेदुखीवर कसे उपचार केले जातात त्याबद्दल त्याबाबत माहिती दिली सिनेमा स्लाईट दाखवताना पूर्वीचा वक्राकार गुडघे घेऊन आलेला पेशंट कसा सरळ चालायला लागला याबद्दलही त्यांनी चित्रफित द्वारे सर्व ज्येष्ठांना दाखवलं गुडघा आणि कमरेतला घोटा यावरच ते उपचार करतात आणि त्या उपचारासाठी त्यांनी दक्षिण कोरिया मध्ये , जर्मनीमध्ये घेतलेलं शिक्षण हे कामी येत आहे. फक्त गुडघेदुखी आणि कमरेतला गोठ्यातला सांधा याच्यातलं कोणाचं दुखणं असेल तर त्याच्यावर ते योग्य पद्धतीने उपचार करतात त्यांची फी देखील त्यांनी त्यावेळेला सांगितली, त्रास काय आहे आणि त्याच्यावर साधा बदलावाच लागेल का? याबाबतची तपासणी करून मगच त्याच्यावर निर्णय घेतला जातो. सर्व ज्येष्ठांना समजेल अशा सोप्या सरळ भाषेत मार्गदर्शन केले संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील त्याचप्रमाणे संस्थेचे चिटणीस एस एम पाटील यांनी शासकीय योजना व ती आपल्या हॉस्पिटलला लागू आहे का याबाबत विचारणा केली असता त्यांनी शासनाने जाहीर केलेल्या पाच लाखापर्यंत च्या खर्चाची योजना गुडघेदुखी साठी अजून लागू करण्यात आलेले नाही असं सूचना त्यांनी केली. पुढे अनेक ज्येष्ठांनी वेगवेगळ्या शंका विचारल्या त्याच समाधान डॉक्टरने केलं. अमळनेर मधील तात्या त्यांच ऑपरेशन डॉक्टरांनी केलं होतं ते देखील या ठिकाणी आले होते त्यांनी देखील त्यांचा अनुभव सांगितला. पाहुण्यांचा परिचय संस्थेचे चिटणीस एस एम पाटील यांनी करून दिला, प्रार्थना श्रावण भाऊसाहेब यांनी ,तर सूत्रसंचालन राजेंद्र नवसारी कर यांनी केलं शेवटी ज्येष्ठांसाठी चहा, नाश्ता देण्यात आला उत्कृष्ट मार्गदर्शन डॉक्टर मनीष चौधरी यांनी केलं अशी प्रत्येकाच्या तोंडातून वदंता निघत होती. यांच्यासोबत जावेद देशमुख व स्वातीताई यांनी देखील सर्व मदत केली मन ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सचिव एस एम पाटील यांनी डॉ मनीष चौधरी यांच्या टीमचे व उपस्थितांचे आभार मानून सभा अध्यक्षांच्या परवानगीने संपल्याचे जाहीर करण्यात आलं

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!