ताज्या घडामोडी

आगळीवेगळी ज्ञानेश्वरी ऊस रसवंती नव्या युगाची ~डॉ अशोकराव ढगे

Spread the love

सेंद्रिय ऊस रसवंती आरोग्याला लाभदायक
डॉक्टर अशोकराव ढगे
नेवासा तालुक्यातील भानस हिवरे रोडलगत विषमुक्त सेंद्रिय खताचा वापर केलेली ऊसापासून रसवंतीगृह विश्वनाथ चव्हाण यांनी सुरू केले आहे
या नैसर्गिक ऊस रसवंतीगृहाचे उद्घाटन कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भानस हिवरे सरपंच किशोर जोजार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जाणता राजा पतसंस्थेचे चेअरमन लक्ष्मणराव मोहिटे व उपसरपंच दत्तात्रय काळे सदस्य शाहू माकासरे प्रगतशील शेतकरी भाऊसाहेब काळे सौ वत्सलाबाई चव्हाण रंभाजी मकासरे रावजी मकासरे आरेब भाई शेख रावजी मकासरे व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.या उस रसवंती गृहाचे वैशिष्ट्य विशद करताना डॉक्टर ढगे म्हणाले की यासाठी ज्ञानेश्वर १६ उसाची जात वापरण्यात येणार आहे या क्षेत्राला कुठल्याही प्रकारचे रासायनिक खतांचा वापर केला नाही तसेच कीटकनाशक व रोगनाशक यांची फवारणी नाही या उसाच्या रसाची प्रयोगशाळेत तपासणी करून असे आढळले की याची प्रत किमान दोन तास खालावत नाही आजच्या नवीन युगात ग्राहकांना नैसर्गिक व सेंद्रिय तसेच विषमुक्त उसाचा ताजा रस देणे ही विश्वनाथ चव्हाण यांची संकल्पना अत्यंत आधुनिक विचारसरणीचे आहे त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी पंचायत समितीचे नेवासा तालुका सभापती किशोर
जोजार  यांनी केले आहे ही संकल्पना व उपक्रम कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे तालुक्यासाठी उपलब्ध झाली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!